एनएमएमएस परीक्षा 28 डिसेंबरला
schedule09 Dec 25 person by visibility 17 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -4 मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस ) इयत्ता आठवीसाठी परीक्षेचे आयोजन रविवार, 28 डिसेंबर रोजी करण्यात आली आहे. ही परीक्षा राज्यात 758 केंद्रावर घेण्यात येणार असून परीक्षेसाठी 13 हजार 789 शाळा व एकूण 2 लाख 50 हजार 544 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे.परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या www.mscepune.in https://mscetunims.in या संकेतस्थळावर शाळांना शाळा लॉगिनवर 10 डिसेंबर पासून उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या प्रवेशपत्रात विद्यार्थ्यांचे नाव, वडीलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितील पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास ही दुरुस्ती करण्यासाठी 27 डिसेंबरपर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या/ अर्जांचा विचार केला जाणार नाही. या दुरुस्त्या परीक्षा झाल्यानंतर करण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.