कोल्हापुरात गव्हर्मेंट लॉ कॉलेज सुरू करा-: अमल महाडिकांची मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी
schedule09 Dec 25 person by visibility 45 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरात गव्हर्मेंट लॉ कॉलेज सुरू करावे अशी मागणी आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस व मंत्री पाटील यांना या मागणीचे निवेदन दिले. कोल्हापूर शहरामध्ये नुकतेच उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कार्यान्वित झाले आहे. कोल्हापूरकरांच्या गेल्या अनेक वर्षांच्या या सर्किट बेंचच्या रूपाने यश आले आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक खटले सर्किट बेंचच्या माध्यमातून मार्गी लागत आहेत. सर्किट बेंचच्या नूतन इमारतीचे बांधकाम शेंडा पार्क परिसरामध्ये होणार आहे. लवकरच उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात होण्याची शक्यता आहे. कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित आहे. भविष्यातील संधींचा विचार करता कोल्हापूरमध्ये शासकीय विधी महाविद्यालय सुरू होणे गरजेचे आहे. ही बाब ध्यानात घेऊन आमदार अ महाडिक यांनी कोल्हापुरात गव्हर्मेंट लॉ कॉलेज सुरू करण्यासाठी मागणी केली आहे. यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री पाटील यांनी दिली.