Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
निर्माता गटात आठ, दिग्दर्शक गटातून नऊ उमेदवार ! अभिनेता गटात पाच जणांमध्ये लढत ! !केआयटीच्यावतीने नूतन कुलगुरू आर के कामत यांचे स्वागत डीवायपी पॉलिटेक्निकचा  योगेश घुले ठरला गुगल स्टुडन्ट अँबेसिडर केएमटीतील रोजंदारी - अनुकंपा कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्या : सभापती सत्यजित जाधव चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून 13 जणांची माघार ! तीन जागा बिनविरोध होणार!! डॉ. सुनेत्रा शिराळे यांना आरोग्य विद्यापीठाची पीएचडीकोल्हापूर महापालिकेला मिळणाऱ्या जीएसटी अनुदानात वाढ कराआयटी पार्कची जागा एमआयडीसीच्या ताब्यात, आमदार राजेश क्षीरसागरांचा पाठपुरावाचित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्राची संख्या वाढवावी - मेघराज राजेभोसलेकृष्णराज महाडिकांनी घेतली पोलिस महासंचालकांची भेट, महत्वपूर्ण विषयासंबंधी निवेदन सादर

जाहिरात

 

निर्माता गटात आठ, दिग्दर्शक गटातून नऊ उमेदवार ! अभिनेता गटात पाच जणांमध्ये लढत ! !

schedule28 May 26 person by visibility 54 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सात जून २०२६ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी ४४ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी अर्थात २८ मे रोजी तेरा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तर अभिनेत्री गटातून वर्षा उसगावकर, संकलन गटातून विजय खोचीकर, आणि संगीत व गायक गटातून आनंद शिंदे यांचे प्रत्येकी एकेक अर्ज असल्याने त्यांच्या बिनविरोधी निवडीची केवळ घोषणा शिल्लक राहिली आहे.

निर्मात गटातील दोन जागेसाठी आठ उमेदवार आहेत. यामध्ये मानसिंग कदम, प्रकाश पाटील, महादेव शिरोळकर, भगवान मैदनकर, गणेश तळेकर, विजय शिंदे, मेघराज भोसले सुनील महाजन हे उमेदवार आहेत. दिग्दर्शक गटातही दोन संचालक निवडले जातील. या गटासाठी नऊ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये दिपक कदम, सुनील घोरपडे, अवधूत जोशी, सतीश रणदिवे, अमोल भावे, अजित शिरोळे, अमरसिंह जगदाळे,  धर्मेद यादव, विजय राणे उमेदवार आहेत. उर्वरित अन्य गटातून प्रत्येकी एक संचालक निवडून द्यायचा आहे. लेखक-कथा –पटकथा संवाद व गीत लेखन  गटात पितांबर काळे व राज काझी यांच्यामध्ये लढत आहे.स्थिर व चलत छायाचित्रण गटात धनाजी यमकर व महेश देशपांडे अशी लढत आहे. अभिनेता गटात पाच उमेदवार आहेत. आदित्य सिंघानिया, अशोक जाधव, सुशांत शेलार, संतोष शिंदे आणि आनंद काळे या उमेदवारात लढत होईल.कला दिग्दर्शक गटातील जागेसाठी सतीश बीडकर, प्रवीण शिवराम पाटील व उल्हास भालचंद्र नांद्रे अशी लढत होणार आहे. नृत्य दिग्दर्शक -नर्तक- नर्तिका गटात अनिल सुतार, संग्राम भालकर, सुभाष नारायण नकाशे तर ध्वनीरेखक गटात शरद चव्हाण व निलेश बुट्टे यांच्यामध्ये लढत होणार आहे.

निर्मिती व्यवस्था व्यवस्थापकीय यंत्रणा गटात मिलिंद अष्टेकर, मनोज मराठे, रविंद्र गावडे असे तीन उमेदवार आहेत. रंगभूषा वेशभूषा व केशभूषा गटात सदांनद सुर्यवंशी, चैत्राली डोंगरे अशी दुरंगी लढत आहे.वितरण स्टुडिओ लॅब प्रदर्शन व प्रसिद्धी विभागात शरद लोणकर, गणेश गारगोटे, प्रकाश जाधव यांच्यामध्ये  लढत आहे.कामगार विभागातही रणजीत जाध व विकास तोरणे यांच्यामध्ये थेट लढत आहे. हे दोघेही कोल्हापूरचे आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes