+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात रविवारी गुरुवंदना महोत्सव adjustगावात नो डॉल्बी, नो डिजीटल फलक ! शांतता-सामाजिक सलोख्याचा माणगाव पॅटर्न !! adjustन्यू मॉडेल ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९९.४९ टक्के adjustकोल्हापुरातील १९० शाळांना मोफत पाठयपुस्तक वाटपास प्रारंभ adjustजिल्हातंर्गत बदली प्रक्रिया सुरू करावी, पुरोगामीचे ग्रामविकासला निवेदन adjustनिधी खर्चावर सीईओंचे लक्ष, अधिकाऱ्यांना सक्त सूचना ! adjustगोखले कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत यश adjustशिवराज्याभिषेक सोहळा लोकोत्सव करण्यासाठी स्वयंसेवकानी वज्रमूठ बांधावी-संभाजीराजे छत्रपती adjust टेनिस स्पर्धेत वरद पोळचा मानांकित खेळाडूवर विजय adjustविवेकानंदमध्ये बारावीतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule10 Apr 24 person by visibility 65 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
 जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी लोकसभा निवडणूकीच्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून महापालिकेच्या टेंबलाईवाडी विद्यालयास भेट दिली. महाराष्ट्र शासनाच्या स्टार्स प्रकल्पांतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी  अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी संदर्भात त्यांनी ही भेट दिली. यावेळी त्यांनी तिसरी ते सातवी च्या वर्गांना भेटी देऊन परीक्षा व्यवस्थेची पाहणी केली. याठिकाणी शाळेने परीक्षेसाठी केलेले नियोजन, बैठक व्यवस्था, विद्यार्थी उपस्थिती व विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या प्रश्न पत्रिकांची पाहणी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी करुन
            जिल्हाधिकारी येडगे यांनी महापालिका टेंबलाईवाडी विद्यालयाची पाहणी केली. विद्यार्थांच्या आवडी निवडी, सुट्टीतील नियोजन, मामाचे गांव अशा विषयावर मुलांशी मुरब्बी शिक्षकाप्रमाणे मोकळेपणाने संवाद साधला. त्याचबरोबर मुलांनी सुट्टीचा उपयोग पोहायला शिकणे, सायकल शिकणे, वेगवेगळी पुस्तकं वाचण्यासाठी करावा व करीयर घडवण्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करावेत असा मोलाचा सल्लाही विद्यार्थ्यांना त्यांनी दिला.  टेंबलाईवाडी विद्यालयाने शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेले यश, शाळेची वाढलेली पटसंख्या, क्रीडा, कला व सांस्कृतिक क्षेत्रात केलेली उल्लेखनीय कामगिरी व शाळेतील विविध उपक्रमांची माहिती जाणून घेऊन सर्व स्टाफचे त्यांनी कौतुक केले. तसेच शाळेच्या भविष्यातील वाटचालीस जिल्हाधिकारी येडगे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. 
            यावेळी प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी एस. के. यादव, पर्यवेक्षक विजय माळी, महापालिका टेंबलाईवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास पिंगळे, शाळेतील सर्व शिक्षक, सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.