
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : दोन सत्रात शाळा भरवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचा आहे. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाच्या या निर्णयाला शिक्षक संघटनांचा विरोध आहे. विरोधामागील नेमकी भूमिका महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद तौंदकर यांनी मांडले आहे
तौंदकर यांनी म्हटले आहे "देशाचे भविष्य शाळांमध्ये घडत असते आणि त्याचे शिल्पकार गुरुजन असतात.गुरुंप्रती आदर व्यक्त करण्यासाठी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा असं म्हटलं आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या शिक्षणाच्या विचारांचा वारसा घेऊन आम्ही कोल्हापूरवासी शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहोत. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या बारा टक्के शिक्षक संख्या कमी आहे म्हणजे जवळजवळ हजारभर शिक्षकांची पदे रिक्त आहेत.तिचं स्थिती मुख्याध्यापक,,केंद्रप्रमुख यांची.त्यांचा आतिरिक्त भार शिक्षकांवरच आहे. तरीही या जिल्ह्यातील शिक्षकांनी आपल्या कामात कसलीही कमतरता न ठेवता शिष्यवृत्ती, एन एम एम एस यामध्ये कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रात पहिला आणला आहे.सरल नास या मुल्यांकनातही जिल्हा आग्रभागी आहे.शिक्षक संख्या कमी असताना सुद्धा निवडणूक विभागाची कामे,सहकारी संस्थांच्या निवडणुकीची कामे शिक्षकांवरच लादली जातात.अडचणींणवर मात करत शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र काम प्रामाणिकपणे करताहेत.पण अलीकडच्या काळामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शिक्षकांचा खूप मोठा राग आहे नेहमी ते शिक्षकांच्या पगारावर बोलतात आणि शिक्षकांचे खच्चीकरण कसे केले जाईल याकडे कटाक्षाने पाहतात, सध्या सकाळच्या सत्रातील शाळांबाबतचा विषय जिल्हा परिषदमध्ये गाजत आहे.दरवर्षी १५मार्च रोजी सकाळच्या शाळांना सुरुवात होते. सकाळी ७ ते ११.४५ अशी शाळांची वेळ असते पण यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शाळा दोन सत्रात भरवण्याचा विषय पुढे आणला आहे. याला सर्व शिक्षक संघटनांचा विरोध आहे. शिक्षक समिती जिल्हा सरचिटणीस प्रमोद तौंदकर यांनी याबाबत आपली भूमिका सांगितली,महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात सकाळच्या शाळा दोन सत्र मध्ये नाहीत. वाढणारे तापमान पाहता मुलांना दोन वेळा शाळेत बोलवणे व्यावहारिक होणार नाही. शिक्षकांना त्रास देण्यसाठी मुलांना वेटीस धरले जात आहे.कांहीं मुले दोन दोन किलोमीटर वरून मोठया भावा बहिणी सोबत येतात पण हे सगळं चित्र शिक्षकांना त्रास देण्यासाठी बदलण्याचा विचार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सो करत आहे
खरंतर जगामध्ये आपण पाहिलं तर शिक्षकांना एका वेगळा मान सन्मान ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे, तिथल्या शिक्षकांना मान सन्मान दिलेला आहे पण माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जाणीवपूर्वक शिक्षकांचे खच्चीकरण करतात असा शिक्षक संघटनांचा आरोप आहे. कोल्हापूर जिल्हा छत्रपती शिवरायांच्या आणि छत्रपती शाहूंच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारा जिल्हा आहे येथे कुणी आम्हाचे खच्चीकरण करत असेल तर निश्चितचं आम्ही त्यास प्रतिकार करु असेही संघटनेची भूमिका आहे.त्यामुळे यापुढे शिक्षक संघटना व मुख्य कार्यकारी आधिकारी यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे."