Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षणाधिकारी मीना शेंडकर निलंबित, शालेय शिक्षण क्रीडा विभागची कारवाईप्राचार्य जी.पी. माळी यांच्या काट्यावरची फुलं या आत्मकथनाचा बारा नोव्हेंबरला प्रकाशन समारंभ आमदार कौस्तुभ गावडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ! जुनी पेन्शन योजना -सेवा ज्येष्ठतेच्या प्रश्नाकडे  वेधले लक्ष ! !सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नेट -सेट आवश्यक करवीर शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा शुभारंभपुणे-बेंगलोर महामार्गावर ३२ तासांपासून स्वाभिमानीचा एल्गार, किणी टोल नाक्यावर हजारो शेतकऱ्यांचा ठिय्यास्मॅकच्या अध्यक्षपदी भरत जाधव, उपाध्यक्षपदी प्रशांत शेळकेगोकुळमध्ये बहुमत समविचारी आघाडीलाच, अध्यक्ष निवडीत घोळ घातल्यास रस्त्यावर उतरून लढाई करूगोकुळमध्ये शासन नियुक्त चार संचालक वाढणार, मतदानाचा अधिकार मिळणार ! मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसतेज पाटलांची गोकुळबद्दलची भावना लोकशाहीसाठी कमी अन स्वतःच्या राजकीय सुलभतेसाठी अधिक- महायुतीचा टोला

जाहिरात

 

शिक्षणाधिकारी मीना शेंडकर निलंबित, शालेय शिक्षण क्रीडा विभागची कारवाई

schedule05 Nov 26 person by visibility 2217 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांना शालेय शिक्षण विभागाने निलंबित केले आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली. 2022- 23 व 23 -24 या वर्षातील आरटीई 25% प्रति पूर्तीची अतिरिक्त रक्कम अदा करून प्रशासकीय दिरंगाई व आर्थिक अनियमित्ता केल्याचे निदर्शनास आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव मो. बा. ताशिलदारर यांनी कारवाईचा आदेश काढला आहे. शिक्षणाधिकारी शेतकऱ्या सध्या शिक्षण आयुक्तालय पुणे येथे शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कोल्हापुरात शिक्षण अधिकारी म्हणून त्यांनी त्यापूर्वी काम केले होते. त्यांच्या कोल्हापुरातील कारकिर्दी विषयी तक्रारी झाल्या होत्या पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी त्यांच्या कामकाजाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या  संदर्भातील लेखी तक्रारींचे  पत्र पालकमंत्री आबिटकर यांनी  सीईओ डॉ  जॅसमिन यांच्याकडे दिले होते. याशिवाय जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतील शिक्षण अधिकारी शंकर यांच्या कामकाजाविषयी सदस्यांनी कामकाजाचा पंचनामा केला होता. मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख पदोन्नतीमध्ये अनिमित्त केल्याचेही सदस्यांनी तक्रार केली होती. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने तीन नोव्हेंबर 2026 रोजी शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांना निलंबित केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes