डॉ. संतोष प्रभूंना जीवन गौरव पुरस्कार ! पुरस्काराने अधिक चांगली वैद्यकीय सेवा देण्याची ऊर्जा लाभली
schedule27 Nov 23 person by visibility 444 categoryआरोग्य
डॉ. संतोष प्रभूंना जीवन गौरव पुरस्कार ! पुरस्काराने अधिक चांगली वैद्यकीय सेवा देण्याची ऊर्जा लाभली
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ गेले चार दशकाहून अधिक काळ वैद्यकीय क्षेत्राचा मला वारसा लाभला आहे. आई-वडिलासह आमचे संपूर्ण कुटुंब वैद्यकीय क्षेत्रात आहे. या कालावधीत वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन कोल्हापूर मेडिकल असोसिएशने प्रदान केलेल्या ‘डॉ. अतुल जोगळेकर जीवन गौरव पुरस्कार’मुळे अधिक चांगली रुग्णसेवा देण्यासाठी ऊर्जा लाभली’असे मत प्रसिद्ध मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. संतोष प्रभू यांनी व्यक्त केले.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोल्हापूर शाखेतर्फे दोन दिवसीय वैद्यकीय परिषद येथील हॉटेल सयाजी येथे झाली. या परिषदेत डॉ. प्रभू यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. परिषदेच्या समारोपादिनी, रविवारी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. परिषदेचे अध्यक्ष डॉ. अर्जुन आडनाईक, डॉ. सूरज पवार, डॉ. राजेंद्र चिंचणेकर, डॉ. विनय चौगुले, डॉ. शीतल देसाई, डॉ. प्रवीण नाईक, डॉ. आबासाहेब शिर्के, डॉ. शीतल पाटील, डॉ. ए. बी. पाटील, डॉ. गीता पिल्लाई, डॉ. अमोल कोडोलीकर यांची प्रमुख उपस्थित होती.
सत्काराला उत्तर देताना डॉ. प्रभू यांनी ‘कोल्हापरातही मेंदूवरील उपचारासाठी अद्ययावत यंत्रणा उपलब्ध आहे. कोल्हापुरात सर्व प्रकारच्या मेंदूच्या शस्त्रक्रिया होतात.’असे नमूद केले. वैद्यकीय परिषदेत डॉ. मनीष मचवे यांनी कायदेशीर समस्या, डॉ. राजगोपाल यांनी हृदयविज्ञानातील प्रगती, डॉ. आनंद कुलकर्णी यांनी मद्यपानामुळे होणारे यकृतचे आजार याविषयी मार्गदर्शन केले.
फ्लॅश नियकाकालिकातून उत्कृष्ट आरोग्यविषयक लेखनाबद्दल डॉ. निकिता दोशी व इतर लेखनासाठी उदय गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. सीपीआर व महापालिका रुग्णालयात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना डॉ. एस. के. कुलकर्णी पुरस्कार देण्यात आला. इस्त्रोतील शास्त्रज्ञ डॉ. वीरमुथुवेल यांच्या हस्ते हा सन्मान झाला