Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
लग्न ठरवायला मुंबईला गेले अन् मुख्यमंत्री नागपूरला अशी विरोधकांची अवस्था - सतेज पाटलांचा महायुतीला टोलागोकुळचे माजी संचालक सत्यजीत सुरेश पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेशराज्यपालांच्यासोबत डॉ संजय डी. पाटलांचा संवाद ! कृषी, साखर उद्योग, दूध व्यवसाय, शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी चर्चा !!पदवीधरांचे रोजगार - आर्थिक प्रश्न घेऊन प्रा. एन. डी. चौगले पदवीधर निवडणुकीच्या मैदानातराज्यपालांनी साधला कोल्हापुरात मान्यवरांशी संवाद ! असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्टचे ४७ वे वार्षिक मॅपकॉन अधिवेशन कोल्हापुरातअपयशाकडे अपयश म्हणून नको त्यातून शिकण्याची संधी म्हणून पाहा –नेमबाज सोनम मस्करकोरे अभियांत्रिकीच्या सिव्हिल विभागातील विद्यार्थ्यांची दक्षिण आफ्रिकेतील कंपनीत  निवडफुलेवाडी परिसरात बिबट्या, वनविभागाकडून शोध ! पोलिस फौजफाटा तैनात ! !संवैधानिक संस्थावर अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसने थांबवावा - खासदार धनंजय महाडिक

जाहिरात

 

डॉ. शेखर भोजराज, बाळ पाटणकर यांना डॉक्टरेट ! डीवाय पाटील विद्यापीठाचा शुक्रवारी दीक्षांत समारंभ!!

schedule19 Mar 24 person by visibility 965 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा १२ वा दीक्षांत समारंभ शुक्रवारी २२ मार्च २०२४ रोजी माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  होत आहे. के.एल.ई. अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अभिमत विद्यापीठ, बेळगावीचे कुलगुरू डॉ. नितीन गंगणे हे या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी स्पाईन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शेखर भोजराज यांना डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एस्सी.) तर क्रीडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष आर. ए. (बाळ) पाटणकर यांना डॉक्टर ऑफ लेटर्स ( डी. लीट.) या पदवीने सन्मानित केले जाणार आहे. हॉटेल सयाजी येथील व्हिक्टोरीया सभागृहात सकाळी  ११ वाजता दीक्षांत समारंभ होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक डॉ. अभय जोशी, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी डी लोखंडे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. राजेश ख्यालाप्पा, उपकुल सचिव संजय जाधव आदी उपस्थित होते.
    डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची स्थापना २००५ मध्ये झाली. विद्यापीठाने शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून यावर्षी नॅक “ए प्लस' मानांकन प्राप्त केले आहे. विद्यापीठाकडून पीएच.डी. प्राप्त केलेले बहुसंख्य विद्यार्थी देश-विदेशात संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. वैद्यकीय व परिचारीका महाविद्यालयाच्या माध्यमातून कोल्हापूर परीक्षेत्रातील गरीब व गरजू रूग्णांना मोफत सेवा दिली जात  असल्याचे डॉ. मुदगल यांनी यावेळी सांगितले. बाराव्या दीक्षांत समारंभात एकूण ६०५ विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी प्रदान केली जाणार आहे. यावेळी ११ विद्यार्थ्याना सुवर्ण पदकाने गौरवण्यात येणार आहे. विद्यापीठाचे माजी प्राध्यापक डॉ.जहागीरदार, डॉ. विनय वाघ आणि डॉ. मिलिंद सबनीस यांच्या नावाने पारितोषिके दिली जाणार आहेत.
डॉ. प्रीती प्रकाश बागवडे या विद्यार्थीनीला संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून सुवर्ण पदक जाहीर करण्यात आल्याची माहिती परीक्षा नियंत्रक अभय जोशी यांनी दिली.
    कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले  पदवीदान कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉ. नितीन गंगणे हे के. एल. ई. अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च, अभिमत विद्यापीठ बेळगावी येथे कार्यरत आहेत. 
डॉ. भोजराज यांना डी. एस्सी.
दीक्षांत समारंभात डी. एस्सी. पदवीने सन्मानीत केले जाणारे डॉ. भोजराज हे जगविख्यात मणका रोग तज्ञ आहेत. स्पाईन फौडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष असेलेले डॉ. भोजराज हे लीलावती हॉस्पिटल, ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल, गुरुनानक हॉस्पिटल येथे कॅन्सल्टंट स्पाईन सर्जन म्हणून ते कार्यरत आहेत. समाजातील गरीब लोकाना मणका उपचार करता यावेत यासाठी २०१९ मध्ये स्थापन केलेल्या स्पाईन फौडेशनच्या माध्यमातून गडचिरोली, आंबेजोगाई, औरंगाबाद, अकोला, रत्नागिरी, कोल्हापूर या ठिकाणी ते सेवा देत आहेत. आजपर्यंत त्यांनी मणक्याच्या १० हजाराहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. 
  बाळ पाटणकर यांना डी.लीट....
   आर. ए. बाळ पाटणकर हे क्रीडाई महाराष्ट्र आणि कोल्हापूरचे माजी अध्यक्ष असून त्यांनी बांधकाम व्यावसायिकांसाठी बनवलेला ‘कोड ऑफ कंडक्ट’ आणि सुरु केलेला ‘दालन’ उपक्रम आजही नावजले जातात. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी तब्बल 35 वर्षे काम करून क्रिकेटच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. या माध्यमातून अनेक नामवंत क्रिकेटपटू घडविण्यात तसेच कोल्हापूरचे नाव क्रिकेट विश्वात उंचावण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड अर्थात नॅबची शाखा कोल्हापूरात सुरु करण्यात त्यांचा पुढाकार होता. या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून ते अंधांसाठी कार्यरत आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पहिले आहे. नागोजीराव पाटणकर हायस्कूलचे अध्यक्ष म्हणून ते शैक्षणिक क्षेत्रातही योगदान देत आहेत. 
  

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes