जिल्हा परिषदेचे पदाधिकारी घेणार तालुकास्तरीय आढावा बैठक, जनता दरबार भरवणार
schedule27 Apr 26 person by visibility 164 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जिल्हा परिषदेशी निगडीत कामाची तालुकास्तरावर निपटारा होण्यासाठी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी तालुकास्तरीय आढावा बैठक घेणार आहेत. संबंधित तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सदस्य, सर्व विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीत नागरिकाशी संवाद साधला जाऊन त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यावर भर दिला जाणार आहे या संदर्भातील माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिल्पा शशिकांत खोत व उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारून महिनाभराचा कारादी उलटला अध्यक्ष उपाध्यक्ष समिती सभापतींच्या निवडी झाल्यानंतर आता प्रत्येकजण आपापल्या विभागाचा आढावा घेत आहे. जिल्हा परिषदेचे कामकाज हे ग्रामीण भागाशी निगडित आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागाची निगडित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी नागरिकांना जिल्हास्तरावर हेलपाटा मारायला लागू नये म्हणून पदाधिकाऱ्यानी आता दर महिन्याला तालुकास्तरीय आढावा बैठकीचे नियोजन केले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष खोत,उपाध्यक्ष पाटील, बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर, शिक्षण समिती सभापती शितल प्रवीण यादव, महिला व बालकल्याण समिती सभापती विद्या विलास पाटील आणि समाजकल्याण समिती सभापती श्रद्धा गायकवाड यांच्यासह विविध विभागाचे खाते प्रमुख त्या आढावा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. सध्या गटविकास अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे ते प्रशिक्षण संपले की तालुकास्तरीय आढावा बैठकीला प्रारंभ होईल. प्रत्येक महिन्यात एका तालुक्याला आढावा बैठक होणार आहे आणि या आढावा बैठकीत ज्या ज्या तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य उपस्थित असतील.