विद्यार्थी - पालकांनी जगण्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे : आमदार सतेज पाटील
schedule23 Aug 26 person by visibility 13 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरिक सेवा संस्था यांच्यावतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सतेज पाटील होते. आमदार पाटील म्हणाले, 'आज स्पर्धेच्या व धकाधकीच्या काळात विद्यार्थ्यांचे बालपण हिरावले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा काळात स्वतःचे करिअर करीत असताना जगण्याबद्दलचा एक नवा सकारात्मक दृष्टिकोन विद्यार्थी आणि पालकांनी अवलंबावा. स्वतःचे करिअर करत असताना व्यवसायिक शिक्षण घेऊन स्वतः समृद्ध बनणे विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे. मोठी स्वप्न बघणं आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र कष्ट करणे, सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे विद्यार्थी व पालकांना गरजेचे आहे.'
यावेळी अनिल म्हमाने यांनी, विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा? विचार कसा करावा? यासाठी घरातील वातावरण कसे असावे? पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी संवादी कसे बनावे? स्पर्धेच्या युगामध्ये लहान मुलांचे बालपण आणि माणूसपण उध्वस्त होणार नाही याची काळजी कशी घ्यावी? यासंबंधी मार्गदर्शन केले
संदीप जंगम यांनी विद्यार्थी आणि त्याची जडणघडण यात पालकांची मोठी जबाबदारी आहे. गुणवंत विद्यर्थी म्हणून आपले करिअर शोधताना नव्या वाटा शोधणे आवश्यक आहे. पारंपरिक शिक्षणासोबत आपले नवनवीन कौशल्य विकसित करणे आणि आधुनिक जगात सक्षम होणे आवश्यक आहे. असे मत व्यक्त केले.
सतीश मुसळे , घनश्याम चक्के, अतुल बांदिवडेकर, सचिन खराडे आदींनी मनोगते व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी दोन्ही संस्थेच्यावतीने जिल्हा, राज्य व देश पातळीवर सातत्याने सुरू असलेल्या समाजाभिमुख कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे निवेदन संघसेन जगतकर यांनी केले. अनिता काळे यांनी आभार मानले.यावेळी महादेव चक्के, संजय सासने, संभाजी थोरात, भगवान माने, सुभाष पाटील, दिनकर आडसूळ, रघुनाथ मुधाळे, संजय गुरव, शिवाजी चौगुले, विजय आरेकर उपस्थित होते.