उद्यम सोसायटीच्या अध्यक्षपदी दिनेश बुधले, उपाध्यक्षपदी नितीन वाडीकर
schedule15 Mar 23 person by visibility 530 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर उद्यम को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षपदी दिनेश बुधले व उपाध्यक्षपदी नितीन वाडीकर यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक कार्यालय अधिकारी पी.एम.मालगावे अध्यक्षस्थानी होते.
अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर बोलताना नूतन पदाधिकाऱ्यानी उद्यम सोसायटीतर्फे लघु उद्योगाला प्रसन्न देण्यासाठी संस्था प्रयत्नशील राहील असे सांगितले. यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक चंद्रकांत चोरगे, हिंदुराव कामते, संजय अंगडी, अशोक जाधव, भरत जाधव, माणिक सातवेकर, सुधाकर सुतार, राजन सातपुते, संगीता नलावडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.