Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ज्ञान- कौशल्य - सकारात्मक दृष्टिकोन ही यशाची त्रिसूत्री :  संजय बाबर विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाइतकेच  कौशल्य विकसित करणे हेच राष्ट्राचे खरे बळ - पद्मश्री जी. डी. यादवनव्या सभागृहाच्या पहिल्या सभेत तरुण नेतृत्वाची छाप, प्रभागासह शहराचे विषय मांडलेनगरसेवकांचा प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार, महापौरांचा अधिकाऱ्यांना सज्जड दमफौन्ड्री उद्योगासह कोल्हापूरच्या हद्दवाढीसंबंधी दिल्लीत केंद्र स्तरावर पाठपुरावा करणार – खासदार प्रवीण खंडेलवालगोकुळकडून म्हैस - गाय दूध खरेदी दरात वाढराखीव कर्मचारी निवडणूक भत्ता : लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित शाश्वत विकास म्हणजे सर्वांगीण विकास होय  : डॉ. यशवंत थोरातअहिंसा-सत्य -अस्तेय ही मूल्ये आजच्या समाजाची अपरिहार्य गरज — डॉ. सुषमा रोटेउदंड होणार नगरसेवक, नावापुढे पद -शहरासाठी योगदानाचे काय ? स्वीकृतच्या पदाचीही खांडोळी ! !

जाहिरात

 

 विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाइतकेच  कौशल्य विकसित करणे हेच राष्ट्राचे खरे बळ - पद्मश्री जी. डी. यादव

schedule21 Feb 26 person by visibility 27 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवायचे असेल, तर केवळ पदव्या नव्हे तर कौशल्यसंपन्न तरुणाई घडवणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाइतकेच "कौशल्य"  विकसित  करणे हेच राष्ट्राचे खरे बळ आहे.’  असे प्रतिपादन   प्रसिद्ध शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ पद्मश्री डॉ.जी. डी. यादव यांनी केले.

महावीर महाविद्यालयातील  शिक्षणशास्त्र विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या “कौशल्याधारित शिक्षण : २१ शतकातील उच्च शिक्षणाचे परिवर्तन” या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली.  या परिषदेत ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.  विकसित भारत २०४७ या संकल्पनेचा सखोल वेध  डॉ.  यादव यांनी घेतला. संस्थेचे चेअरमन ॲड. के. ए. कापसे अध्यक्षस्थानी  होते.  यावेळी  व्हाइस चेअरमन ॲड. अभिजित कापसे, सचिव मोहन गरगटे,  खजानीस  गुणवंत रोटे, संचालक   नरेंद्र देसाई,  प्रदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
 आशुतोष  कापसे म्हणाले, "स्कील" हा शब्द सर्वत्र ऐकण्यास येतो. पण शिक्षकांची खरी चिंता-प्रश्न एकच आहे.“आम्ही नेमकं काय करायचं?  आज कौशल्ये “स्थिर” राहिलेली नाहीत; ती गतिशील झाली आहेत. डॉ. अरुण  पाटील म्हणाले,‘ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या क्षमताविकासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. शिक्षकांनी केवळ विषय शिकवणारे न राहता विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख, कौशल्यसंपन्न आणि रोजगारक्षम बनविण्याचे ध्येय ठेवावे.’

 पुण्याच्या एस. एन. डी.टी कॉलेजचे प्राचार्य डॉ . गणेश चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. अव्दैत जोशी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. हेमंत पाटील, प्रा. श्रद्धा पाटील, बाळगोंडा पाटील व जावेद मेस्त्री  यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.  प्रा .डॉ. संध्या जाधव व प्रा. सायली चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. कल्पना गंगातीरकर यांनी आभार मानले. यावेळी  डॉ. महादेव शिंदे, डॉ. गोमटेश्वर पाटील, प्रा जयवंत दळवी , प्रा. डॉ. रवींद्र मिरजकर, डॉ. संदीप नलवडे, अंकित पोरवाल, डॉ. शशिकांत पाटील, प्रा. जावेद मेस्त्री , डॉ. स्वप्निल पाटील  प्रा. राहुल आडके उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes