Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डॉ. प्रभाकर कोरे यांना घाळी समाजभूषण पुरस्कार, २४ ऑगस्टला वितरणकोल्हापूर प्रेस फोटोग्राफर क्लबचे पुरस्कार जाहीर !  अनिल वेल्हाळ, संजीव भोर यांना पुरस्कार ! !ताराबाई पार्कातील गोकुळ शॉपीला नवा लूक, दुधासह दुग्धजन्य पदार्थ उपलब्धहॉस्पिटल चालविण्याचा परवाना नाही, मात्र चक्क सहा वर्षे प्रॅक्टिस ! एक हॉस्पिटल सील, एका डॉक्टरांना आर्थिक दंड ! !प्रत्येक नागरिकाने कायद्याबाबत सजग असावे -: पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाडमहापालिका निवडणूक - राजकारणातून मला बदनाम करण्याचा घाट - सुशांत पोवारसचिन शिरगावकर यांना उद्योगरत्न पुरस्कार, डॉ. आनंद देशपांडेंच्या हस्ते गुरुवारी वितरण समारंभकोल्हापूर जिल्हा बहुजन शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नंदकुमार कांबळे, उपाध्यक्षपदी दत्तात्रय टिपुगडेअंबाबाई मंदिर आराखड्यातील भूसंपादनासाठी योग्य मोबदला मिळणार; कोणावरही अन्याय होणार नाहीसहकार उपनिबंधकांकडून अवसायनातील २९८ दूध संस्थाही मतदानास पात्र   

जाहिरात

 

बांधकाम व्यावसायिकाला एक कोटीच्या खंडणीसाठी धमकावले, साईटवरील बांधकाम बंद पाडले !  पाच खंडणीखोराविरोधात गुन्हा !!

schedule01 Jul 26 person by visibility 647 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर येथील एका बांधकाम व्यावसायीकाकडे तब्बल एक कोटी रुपयाची खंडणी मागितल्याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिक निलेश सुरेश जाधव यांनी यासंबंधी फिर्याद दिली. आरोपी म्हणून रुईकर कॉलनी येथील अजित भगवान तिवडे, साळोखेनगर चव्हाण कॉलनीतील फैयाज इसाक नगरजी, उचगाव येथील लखन बाळासाहेब माने, मणेरमाळ येथील संजय महावीर किरणगे व लालाशेठ यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
 यातील फिर्यादी निलेश जाधव यांचे मोरेमाने नगर येथे सोनी हाइट्स या नावाने प्रकल्प सुरू आहे. त्यांच्याकडे या पाच आरोपीनी 29 एप्रिल 2026 , सहा व आठ जून 2026 रोजी बांधकाम व्यवसाय करण्यासाठी एक कोटी रुपयांची मागणी केली. सोने हाइट्स या प्रकल्पाच्या ठिकाणी व  रुईकर कॉलनीतील तिवडे यांच्या कार्यालयात बांधकाम व्यावसायिकला बोलावून दमदादी केली.  तसेच तिवडे यांच्या कार्यालयात कोंडून ठेवले. शिवाय बांधकाम व्यवसायिकांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या मोठ्या भावालाही धमकावले असे फिर्यादीत म्हटले आहे. आठ जून रोजी पुन्हा एकदा आरोपीनी बांधकाम व्यवसायिकाला धमकावले.  ' आमचा विषय मिटवल्याशिवाय काम चालू करायचे नाही' असे दमदाटी करत साईटवरील बांधकाम बंद पाडले  अशी फिर्याद बांधकाम व्यावसायिक जाधव यांनी दिली आहे. बुधवारी एक जुलै रोजी फिर्याद दाखल करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes