+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे.
Screenshot_20240226_195247~2
schedule14 Apr 24 person by visibility 83 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री  अंबाबाई देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया १५ एप्रिल २०२४ अखेर पर्यंत सुरु राहणार आहे. या कालावधीत भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन होणार नसल्याने कलश व उत्सव मूर्ती पितळी उंबऱ्याच्या आतमध्ये ठेवून भाविकांना पितळी उंबऱ्याच्या बाहेरुन योग्य पद्धतीने दर्शनाची सोय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
 करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीची संवर्धन प्रक्रिया करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक अमोल येडगे यांनी भारतीय पुरातत्व विभागाला कळविले होते. भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विज्ञान शाखा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दि.१२ व १३ एप्रिल २०२४ रोजी मूर्तीची पाहणी करुन मूर्तीच्या संवर्धनाची प्रक्रिया १४ एप्रिल २०२४ रोजी सुरु केली आहे, अशी माहिती देवस्थान समितीने दिली आहे.