Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अभाविपचे विद्यापीठात आंदोलन, काही कार्यकर्ते कुलगुरूंच्या केबिनमध्ये घुसले वंदूरच्या पाटील बंधूचा सेंद्रीय गूळ उद्योग ! परराज्यातही पसरला गोडवा, शंभर रुपये किलोने विक्री !महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध होणारपाच कोटी रुपयांच्या बक्षीसाचे पंचायतराज अभियान हे देशातील एकमेव-जयकुमार गोरेबॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाला केंद्रीय मंत्र्यांकडून पुरस्कार प्रदानटीईटी अनिवार्य चुकीचे, पुरोगामीकडून राज्यातील आमदार-खासदारांना पत्रेकोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनमध्ये आज जीएसटीबाबत कार्यशाळाप्रा. जयसिंग दिंडे यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएचडीपुनर्विचार याचिकेसाठी सरकारवर वाढता दबाव, शिक्षक संघटना सरसावल्या ! मंत्री- आमदार –खासदारांना पत्रे !!टीईटीसंबंधी दोन दिवसात उच्चस्तरीय समितीची बैठक, धैयशील मानेंनी घेतली दादा भुसेंची भेट

जाहिरात

 

पक्षाच्या आंदोलनापासून काँग्रेसचे नगरसेवक दूरच ! विधानसभेची धुसफूस शमली नसल्याचे चित्र !!

schedule25 Jan 25 person by visibility 496 categoryमहानगरपालिका

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : निवडणूक आयोगाच्या पक्षपाती भूमिकेच्या विरोधात काँग्रेस पक्षातर्फे कोल्हापुरात शनिवारी (२५ जानेवारी) आंदोलन पुकारले होते.  या आंदोलनात पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सहभाग होता. मात्र या आंदोलनाकडे काँग्रेसच्या बहुसंख्य नगरसेवकांनी पाठ फिरवल्याचे चित्र होते. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापतिपदासह अन्य महत्वाची पदे भूषविलेले नगरसेवक आंदोलनापासून दूरच राहिले. यावरुन विधानसभा निवडणुकीतील धुसफूस अजून शमली नसल्याची चर्चा मात्र कार्यकर्त्यांत होती.  स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटीसमोर झालेल्या आंदोलनात हातावर मोजण्याइतके नगरसेवक आंदोलनात दिसत होते.

 निवडणूक आयोगाची भूमिका ही भाजपधार्जिणी असल्याचा आरोप करत काँग्रेसतर्फे राज्यभर शनिवारी आंदोलन पुकारले होते. त्यानुसार कोल्हापुरात सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आंदोलन झाले. यामध्ये आमदार जयंत आसगावकर, काँग्रेसचे पदाधिकारी सुर्यकांत पाटील बुद्धिहाळकर,  शशांक बावचकर, शहराध्यक्ष व माजी नगरसेवक सचिन चव्हाण, माजी नगरसेविका भारती पोवार, लीला धुमाळ, जय पटकारे, नगरसेविकेचे पती रियाज सुभेदार, फिरोज सौदागर, सागर यवलुजे आदींचा सहभाग होता. या मंडळीसह पक्षाचे अन्य कार्यकर्त्यांसह पक्ष कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर निदर्शने झाली. यानंतर खासदार विशाल पाटील यांची काँग्रेस कमिटीत पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेवेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, माजी उपमहापौर संजय मोहिते, ईश्वर परमार दाखल झाले.   

 कोल्हापुरात काँग्रेस पक्षाचा कोणताही कार्यक्रम असो, त्या ठिकाणी नगरसेवकांची उपस्थिती आवर्जून असते. दरम्यान राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून निवडणूक आयोगाच्या पक्षपाती धोरणाविरोधात झालेल्या आंदोलनाकडे अनेकांची अनुपस्थित ठळकपणे जाणवत होती. काँग्रेसकडून २०१५ ते २०२० या कालावधीत अश्विनी रामाणे, स्वाती यवलुजे, शोभा बोंद्रे, निलोफर आजरेकर हे महापौर झाले. आंदोलनाला एकही माजी महापौर नव्हते. याशिवाय महापालिकेती काँग्रेसची धुरा सांभाळणारे स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख, संदीप नेजदार, माजी उपमहापौर अर्जुन माने यांची गैरहजेरी जाणवत होती. माजी नगरसेवक सुभाष बुचडे, श्रावण फडतारे, माधुरी संजय  लाड, राजाराम गायकवाड, दिलीप पोवार,  सुरेखा शहा, शोभा कवाळे, उमा शिवानंद बनछोडे, छाया उमेश पोवार, राहुल माने, प्रतापसिंह जाधव, जयश्री चव्हाण, भूपाल शेटे, प्रविण केसरकर, लाला भोसले, वृषाली दुर्वास कदम, दिपा दिलीप मगदूम, रिना कांबळे, प्रतीक्षा धीरज पाटील, वनिता देठे आदी काँग्रेसशी निगडीत मंडळी आंदोलनापासून लांबच राहिल्याचे चित्र होते. अनेकदा महिला नगरसेवकांचे पती महापालिकेत व अन्य कार्यक्रमात असतात. मात्र ते ही आंदोलनस्थळी फिरकले नाहीत.

माजी नगरसेवकांच्या गैरहजेरीवरुन काही जणांनी लक्ष वेधले.  विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये धुसफूस उफाळली होती. मतभेद चव्हाटयावर आले होते. तेव्हापासून निर्माण झालेली दरी अजून मिटली नसल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. नगरसेवकांमध्येच तीन-चार गट झाले आहेत. विधानसभेतील उमेदवार राजेश लाटकर ही आंदोलनस्थळी दिसले नाहीत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes