चेतन नरकेंची मलेशियातील ग्लोबल सीएफओ समिटमध्ये निवड
schedule27 Sep 23 person by visibility 333 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट वर्ल्ड इंटेलीजन्स द वेस्टीनच्या वतीने ३ ते ५ ऑक्टोबर २०२३ दरम्यान मलेशियातील क्वालालंपूर येथे ग्लोबल सीएफओ समिटचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मार्गदर्शन करणाऱ्या जगातील ५० वक्त्यांमध्ये भारतातील डॉ चेतन नरके यांची निवड करण्यात आली आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात जगातील प्रमुख बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सीएफओ सहभागी होणार आहेत. जगभरातील अर्थकारण आणि व्यापाराची समीकरणे बदलत आहेत. अशावेळी सीएफओंची भूमिका हि केवळ वित्त नियोजन आणि लेखा परीक्षण एवढीच राहत नसून मनुष्यबळ विकास, व्यावसायिक नियोजन आणि व्यवस्थापन, उत्पादन, विपणन, जाहिरात, अशा सर्वच घटकात सीएफओंच्या कामाला आणि भूमिकेला महत्व प्राप्त झाले आहे. या आणि अशा विविध विषयावर या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे. येणाऱ्या काळात सीएफओंना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे ? त्याच्याकडून कशी कार्य पद्धती अपेक्षित आहे ? या विषयावर डॉ नरके मार्गदर्शन करणार आहेत.