खडके अकॅडमी बोरपाडळेचा दहावीचा सलग अकराव्या वर्षी शंभर टक्के निकाल
schedule08 May 26 person by visibility 14 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत श्री आर आर खडके अकॅडमी बोरपाडळे संचलित पन्हाळा व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल इंग्रजी माध्यम व शर्विल खडके हायस्कूल बोरपाडळे मराठी माध्यम या दोन्ही शाळांचा सलग अकराव्या वर्षी शंभर टक्के निकाल लागला. पन्हाळा व्हॅली स्कूलमध्ये अनुक्रमे कु.वेदिका पाटील ९४.६० टक्के, पूजा पाटील ८७.४० टक्के , यश चौगुलेने ८७ टक्के गुण मिळविले. शर्विल खडके हायस्कूलमध्ये जान्हवी खोत ९२ टक्के, आदिती जाधव ८४ टक्के, गंधर्व मोहितेने ८३.२० टक्के गुण मिळविले. विद्यार्थ्यांना नाट्य लेखक रघुनाथ खडके, संस्थापक प्राचार्य अविनाश खडके, प्राचार्या क्रांती खडके उपप्राचार्य अयोध्या पाटील, रश्मी पवार व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.