डी वाय पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव, 90 वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा
schedule24 Oct 25 person by visibility 32 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी वाय पाटील (दादासाहेब) यांचा 90 वा वाढदिवस बुधवारी कौटुंबिक वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील निवासस्थानी कुटुंबीयांनी औक्षण करून त्यांना दीर्घायुष्यसाठी शुभेच्छा दिल्या. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी दादासाहेबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी १९८४ साली कसबा बावडा येथे पहिले अभियांत्रिकी महविद्यालय सुरू केले. त्यानंतर कोल्हापूर, मुंबई व पुणे येथे डी.वाय’ पाटील ग्रुपचा विस्तार करत अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, व्यवस्थापन, आर्किटेक्चर, हॉस्पीटल, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था सुरू केल्या. दादासाहेबांच्या दूरदृष्टी नेतृत्वातून आज 8 विद्यापीठे, 17 अभियांत्रिकी महाविद्यालये, 182 संस्था, 22 हजाराहून अधिक कर्मचारी, सव्वा चार लाखाहून अधिक माजी विद्यार्थी असा संस्थेचा मोठा विस्तार झाला आहे.
शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या डी वाय पाटील यांनी बुधवारी ९१व्या वर्षात पदार्पण केले. कुटुंबीयांनी औक्षण करून दादासाहेबांना निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देत आशीर्वाद घेतले. दादासाहेबाच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शांतादेवी डी. पाटील, डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज डी. पाटील, राजश्री काकडे, डॉ. प्रिया चोलेरा, वैजयंती संजय पाटील, श मेघराज काकडे, डॉ. प्रदीप पालशेतकर, पृथ्वीराज पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील, करण काकडे, चैत्राली काकडे, यांच्यासह सुना, जावई, नातसुना-जावई, नातवंडे- पणतवंडे यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.
विविध क्षेत्रातील मान्यवरांनी फोनद्वारे दादासाहेबाना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. खासदार शाहू महाराज छत्रपती,डी वाय पाटील विद्यापीठ, पुणेचे कुलपती डॉ पी डी पाटील, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार के पी पाटील, माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे, डॉ बी पी साबळे, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सतिश पावसकर, चिमणराव डांगे, धैर्यशील पाटील ( इस्लामपूर), जयंत प्रदीप पाटील, डी आर मोरे, गोकुळचे संचालक बाबासो चौगले, शशिकांत पाटील चुयेकर, किसन चौगले आदींनी शुभेच्छा दिल्या.