+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustराजेश क्षीरसागर धावले पूरग्रस्तांच्या भेटीला, भर पावसात विविध ठिकाणांची पाहणी adjustकाँग्रेसकडून सतेज पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी ! समन्वय समितीत स्थान ! adjustजयंती नाल्यावर पाणी, वाहतुकीसाठी मार्ग बंद adjust४०९ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी ! सीईओंनी शब्द पाळला, शिक्षणाधिकाऱ्यांचे गतीमान कामकाज !! adjustपावसाचा रपाटा- पाण्याचा विळखा कायम ! घरांची पडझड, नागरिकांचे स्थलांतर!! adjustकास्ट्राइब शिक्षक संघटना कोल्हापूरतर्फे आरक्षण दिन साजरा adjustपूरग्रस्त कुंभार समाजाच्या मदतीसाठी भाजपाची जिल्हा प्रशासनाकडे धाव adjustभारतीय मजदूर संघाचा ६९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा adjustजबाबदारीने पेलतेय तरुण पिढी शिक्षण संस्थांची कामगिरी adjustदेवराज बोटिंग क्लबने रंकाळा तलावातील कचरा हटविला
1000653813
1000630884
1000621806
1000615695
schedule02 Apr 24 person by visibility 178 categoryजिल्हा परिषद

शाहू छत्रपतींचे वलय मोठे, कोल्हापूरच्या प्रगतीचा आलेख आणखी उंचावेल –आमदार ऋतुराज पाटील
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर 
कोल्हापूर : ‘छत्रपती कुटुंब आणि पाचगाव यांच्यामध्ये वेगळे ऋणानुबंध आहेत.शाहू छत्रपतींचे वलय मोठे आहे. त्यांच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चौफेर प्रगतीचा आलेख आणखी उंचावेल’ असा विश्वास कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला.
 महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ पाचगाव, मोरेवाडी येथे सभा झाल्या. पाचगाव येथील लक्ष्मी नारायण सभागृह येथे झालेल्या प्रचार मेळाव्याला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. उमेदवार शाहू छत्रपती यांचा सरपंच प्रियांका पाटील, उपसरपंच सचिन पाटील व सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच पाटील यांनी, ‘पाचगावमधून शाहू छत्रपतींना मताधिक्क्य देऊ’असे सांगितले.
  आमदार पाटील म्हणाले, ‘राजर्षी शाहू महाराजांच्या विचार कार्याचा वसा आणि वारसा घेऊन शाहू छत्रपती काम करत आहेत. शाहूछत्रपतींचे वलय आणि ताकत मोठी आहे. शहर आणि गावांच्या विकास प्रकल्पासाठी ते एखाद्या मंत्र्यांच्याकडे गेले तर हमखास निधी मिळणार. प्रस्ताव नाकारण्याचे, निधी देताना हात आखडता घेण्याचे धाडस कोणी करणार नाही.’ शिवसेनेचे उपनेते संजय पवार म्हणाले, ‘महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारात कोल्हापुरात शिवसेना कुठेही कमी नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शाहू छत्रपती यांना विजयी करेपर्यंत थांबायचे नाही असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. हात या चिन्हावर बटण दाबून शाहू छत्रपतींना मतदान करा. संबंध देशात ते सर्वाधिक मतांनी विजयी होतील यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील राहू.गेल्या वेळी निवडून गेलेले जिल्ह्याचे दोन्ही खासदार विश्वासघातकी निघाले. विश्वासघात करणाऱ्या त्या दोन्ही खासदारांना पराभूत करू. ’
 उमेदवार शाहू छत्रपती म्हणाले, ‘कोल्हापूरच्या जनतेने ही उमेदवारी देऊ केली आहे. रयतेचा मी उमेदवार आहे. जनतेच्या कामासाठी नेहमीच उपलब्ध असेन. साऱ्यांच्या सोबतीने कोल्हापूरचा कायापालट करू. ’ कमर्शियल बँकेचे संचालक युवराज गवळी यांचे भाषण झाले.कोअर कमिटीचे प्रमुख नारायण गाडगीळ यांनी प्रास्ताविक केले. कोअर कमिटीचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. माजी सरपंच संग्राम पाटील यांनी आभार मानले. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, अवधूत साळोखे, तालुकाप्रमुख विराज पाटील, गोकुळचेसंचालक बाबासो चौगले, शशिकांत पाटील चुयेकर, प्रकाश पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका स्मिता गवळी, ग्रामपंचायत सदस्या दीपाली  गाडगीळ अश्विनी चिले, पौर्णिमा कांबळे, रोमा नलवडे, संग्राम पोवाळकर, शांताराम पाटील, संजय शिंदे, अमित कदम, सागर दळवी, माजी उपसरपंच प्रकाश गाडगीळ आदींच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा झाला.
……………………………….
मोरेवाडीतील मेळाव्यात शाहू छत्रपतींना पाठिंबा
शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ मोरेवाडी येथे मेळावा झाला. सरपंच ए. व्ही. कांबळे व सदस्यांच्या हस्ते उमेदवार शाहू छत्रपती यांचा सत्कार झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचने पाठिंबा जाहीर केला. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मनिषा वास्कर, दत्ता भिलुगडे, अमर मोरे, बाबूराव भोसले, आशिष पाटील, ऋषीकेश भिलुगडे आदी उपस्थित होते.