बावडेकर क्रिकेट स्पर्धा आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलने जिंकली
schedule02 Dec 23 person by visibility 277 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित व नील राजे पंडित बावडेकर पुरस्कृत भैय्यासाहेब बावडेकर स्मृती चषक पंधरा वर्षाखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलने पटकावले. या स्पर्धेत १२ स शालेय संघांनी भाग घेतला होता.
आजचा अंतिम सामना आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल व संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल यांच्यामध्ये छत्रपती शाहू स्टेडियम येथे खेळवण्यात आला.
प्रथम फलंदाजी करताना संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने 30 षटकात 4 बाद 120 धावा केल्या. यामध्ये विश्व ठक्कर ने 40 धावा, कुणाल सारडा ने 31 तर विजय के ने नाबाद 10 धावा केल्या. अवांतर 16 धावा मिळाल्या. आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलच्या शिवराज संकपाळणे 17 धावा चार बळी घेतले, तर वीरेन कोळकीने 22 धावात तीन बळी घेतले. उत्तरा दाखल खेळताना आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलचा 24.1 षटकात 5 बाद 122 धावा जमवत पाच गड्यांनी सामना जिंकला. यामध्ये आदित्य जाधवने नाबाद 72 धावांची खेळी केली. त्याला विरेन कोळकिने 20 धावा व श्रवण देसाईने 7 धावा करून मोलाचे सहाय्य केले. अवांतर 16 धावा मिळाल्या. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या अद्वेत नार्वेकरने 19 धावात 2 बळी विहान लादाने 23 धावात दोन बळी व संकेत पाटीलने एक बळी घेतले.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ बावडेकर परिवाराचे नील पंडित यांच्या हस्ते झाला. यावेळी के एस ए चे पदाधिकारी माणिक मंडलिक, नंदकुमार बामणे, राजेंद्र दळवी, विश्वंभर मालेकर व दीपक घोडके उपस्थित होते.
विजेता आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल व उपविजेता संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल या दोन्ही संघांना ट्रॉफी देण्यात आली. या स्पर्धेतील
उत्कृष्ट फलंदाज आदित्य जाधव आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल
उत्कृष्ट गोलंदाज विश्व ठक्कर संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल. मालिकावीर अर्णव पाटील सेंट झेवियर्स स्कूल व सामनावीर आदित्य जाधव आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल यांना ट्रॉफी देण्यात आली.
तसेच उपांत्य फेरीतील 2 सामन्यांचे सामनावीर नील पटेल संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल व निशांत सुतार आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल यांनाही ट्रॉफी देण्यात आली. नंदकुमार बामणे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.