+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे.
Screenshot_20240226_195247~2
schedule11 Mar 24 person by visibility 152 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
येथील शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर झालेल्या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाने दिलबहार तालीम मंडळाचा ३-० असा एकतर्फी पराभव करत सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाटाकडील तालीम मंडळाने स्पर्धेचे आयोजन केले आहे.
पूर्वार्धात दोन्ही संघानी वेगवान खेळ केला. बालगोपालच्या मिथाई आणि यशराज कांबळे यांचे वेगवान फटके गोलरक्षक सुशाम घराळे याने चपळाईने पंच केले. सामन्याच्या २८ व्या मिनिटाला मिथाई याने मारलेल्या काॅर्नर किकवर यशराज कांबळे सुरेख हेडरद्वारे गोल केला. दिलबहारच्या सिविल आणि अभिषेक भोपळे यांच्या चढाया अचूक समन्वयाअभावी वाया गेल्या. मध्यंतरास बालगोपाल १-० असा आघाडीवर होता.
उत्तरार्धात ५१ व्या मिनिटाला मिथाईने मारलेल्या काॅर्नर किकवर मनीकंदन मुरुगनने सुरेख हेडरद्वारे चेंडूला जाळ्याची दिशा दाखवली. दोन गोलच्या आघाडीनंतर दिलबहार संघांवर दबाव वाढला. बालगोपालच्या सागर पोवारचा वेगवान फटका गोलरक्षक सुशाम घराळेने डावीकडून सूर मारुन तटवला. ६० व्या मिनिटाला आकाश मोरे याने मैदानी गोल केला. तीन गोलची घसघशीत आघाडी कायम टिकवत बालगोपालने सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. बाल गोपाल कडून आकाश मोरे ,सागर पवार, सुरज जाधव, अक्षय मंडलिक, मिथाई तर दिलबहारकडून रोहन दाभोळकर, सतेज साळोखे , सॅम्युअल निक्सन ,अभिषेक भोपळे, सुमित घाटगे सिविल यांचा चांगला खेळ झाला.
बालगोपालच्या मनीकंदन मुरुगण याची सामनावीर तर दिलबहारच्या सतेज साळोखे याची लढवय्या खेळाडू म्हणून निवड झाली. 
मंगळवारचा सामना,
 पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स दुपारी चार वाजता.