+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust.लोहिया हायस्कूलची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत धडक adjust कुलगुरू डॉ.के.प्रथापन यांचा अवॉर्ड ऑफ ऑनरने गौरव adjustराजाराम कारखान्याच्या वार्षिक सभेत सर्व प्रश्नांची उत्तरे देणार - अमल महाडिक adjustकोल्हापुरात निघणार २५ हजार शिक्षक-कर्मचाऱ्यांचा मोर्चा! आंदोलनात पालकांचाह सहभाग !! adjust पर्यटन व्हिलेज स्पर्धेत पाटगावला राष्ट्रीय स्तरावर कांस्यपदक adjustचांदेकरवाडीच्या कुस्ती मैदानात सुभाष निऊंगरेचा प्रेक्षणीय विजय adjustशेतकरी संघ बचावासाठी धडक मोर्चा ! पालकमंत्री- जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध !! adjust चेतन नरकेंची मलेशियातील ग्लोबल सीएफओ समिटमध्ये निवड adjustसासूबाई जोरातमध्ये उलगडणार सासू-जावयाची धमाल गोष्ट adjustवीरशैव बँकेला चार कोटी ७१ लाखाचा नफा, सभासदांना दहा टक्के लाभांश
Screenshot_20230905_091804~2
Screenshot_20230903_122011~2
schedule28 May 23 person by visibility 262 categoryराजकीय
राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांसाठी पहिले समर्पित कार्यालय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
कोल्हापूर मधील नागाळा पार्क येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांसाठी पहिल्या समर्पित नवीन जिल्हा कार्यालयाचा शुभारंभ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. आगामी काळात हे कार्यालय लोकसवेचे प्रमुख केंद्र ठरेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातील सर्व कार्यकर्त्यांना उद्देशून भाजपाचे प्रत्येक जिल्ह्यात सर्व सोईसुविधांनी सुसज्ज असे कार्यालय असावे, असा आग्रह धरला होता. त्याला अनुसरून कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी नागाळा पार्क येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे कार्यालय उभारण्यात आले आहे. 
राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांसाठीचे हे पहिले समर्पित कार्यालय आहे. संपूर्ण राज्यभरातून बैठकीसाठी कोल्हापुरात येणाऱ्या पदाधिकाऱ्यांसाठी कॉन्फरन्स हॉल, अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांसाठीचे विशेष दालन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असा सायबर विभाग, ग्रंथालय अशा विविध विभागांनी सुसज्ज करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून रविवारी या कार्यालयाचा शुभारंभ केला. "भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सांगितलेला अंत्योदयचा मंत्र घेऊन, भाजपाचे कार्यकर्ते अहोरात्र सेवाकार्य करत असतात. त्यामुळे आगामी काळात हे कार्यालय लोकसवेचे प्रमुख केंद्र ठरेल," असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.
आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, डॉ. संजय एस. पाटील, सरस्वती साडी सेंटर शंकर दुल्हाणी, बाळ पाटणकर कारखानदार सुरेंद्र जैन, राजू पाटील, सुहास लटोरे,  सुजित चव्हाण, भाजपा पदाधिकारी महेश जाधव,  सरचिटणीस विठ्ठल पाटील, नाथाजी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल देसाई, राजवर्धन निंबाळकर, माजी नगरसेवक सत्यजित कदम, विजय सुर्यवंशी, आशिष ढवळे, अजित ठाणेकर, किरण नकाते,भाजप महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, तालुका पदाधिकारी हंबीरराव पाटील,नामदेव पाटील, झाकीर जमादार, आनंदा माळी, पोपट पुजारी, संजय पाटील कागल, सुनील मगदूम,आनंदराव साने, गजानन सुभेदार,अमर जत्राट,श्यामराव जोशी, पृथ्वीराज पवार, महेश चौगले,अनिल देसाई, दत्तात्रय मेडशिंगे, अजय चौगले, डॉ. एल.बी. पाटील, विजय अग्रवाल, संदीप देसाई,  सुनील चव्हाण, भूपाल कांबळे, अजिंक्य चव्हाण,नामदेव कांबळे, माणिक पाटील- चुयेकर,संदीप कुंभार, विद्या बनसोडे, आशिष कापडेकर, विवेक व्होरा, सुनील पाटील आझम जमादार, शाहरुख गडवाले, विजयेंद्र माने, मिलिंद भिडे, गजेंद्र हेगडे, निखिल पाटील जाठरवडी,सुबोध कुसाळे, सचिन शिपुगडे, राजेश पाटील,राजू ठोमके,महेश पाटील, अमोल पालोजी, हेमंत कांदेकर, हेमंत अराध्ये,महेश यादव, अजित चव्हाण, गायत्री राऊत, अनंत खासबारदार, विशाल शिराळकर, अमरसिंह भोसले, डॉ राजवर्धन भरत काळे आदीसह कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. 
................
यंदाचा वाढदिवस आरोग्य सेवेसाठी समर्पित
 मंत्री पाटील हे आपला वाढदिवस दरवर्षी लोकसेवेसाठी समर्पित करत असतात. त्यासाठी कार्यकर्त्यांनी हार, फुले आणि बुके नको, जनसेवेसाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करतात. यंदा त्यांनी आपल्या १० जून रोजीच्या वाढदिवस आरोग्यासाठी समर्पित केला आहे. प्रदीर्घ आजारांवर मात करताना आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबाची होणारी ओढाताण टाळण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन  पाटील यांनी केले आहे.