+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustडीवाय पाटील बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थिनींची कंपन्यामध्ये निवड adjustपार्सलमध्ये काही बेकायदेशीर नसेल तर २० लाख का दिले : शीतल फराकटे यांचा सवाल adjustजिल्हा नियोजन समितीची सभा सहा जुलैला adjustबाजार समिती सभापतिपदी जनसुराज्यचे प्रकाश देसाई, उपसभापतिपदी सोनाली पाटील adjustजिप कर्मचाऱ्यांना राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार जाहीर adjustजिपतर्फे यशवंत सरपंच- ग्रामपंचायत पुरस्कार जाहीर ! adjustकोल्हापूर जिपचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर adjustसुनीलकुमार लवटेंचे उच्च कोटीचं दातृत्व ! समाजकार्यासाठी एक कोटीचा निधी !! adjustकेआयटीच्या स्टार्टअपची दखल, सरकारकडून पाच कोटीचा निधी मंजूर adjustशिक्षक संघातर्फे जिप अधिकाऱ्यांचा सत्कार
1000474700
1000469021
Screenshot_20240226_195247~2
schedule10 Jul 23 person by visibility 894 categoryसंपादकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर विभागीय (उच्च शिक्षण) शिक्षण सहसंचालकाचा अतिरिक्त कार्यभार डॉक्टर अशोक उबाळे यांनी सोमवारी (१० जुलै) स्वीकारला. उबाळे यांच्याकडे दुसऱ्यांदा शिक्षण संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. यापूर्वी त्याने डिसेंबर २०१९ ते जुलै २०२१ या कालावधीत कोल्हापूर विभागाचे शिक्षण सहसंचालकपद सांभाळले होते.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या आठवड्यात शिक्षण सहसंचालक कार्यालयावर छापा टाकून‌ तीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. यामध्ये शिक्षण सहसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे डॉ हेमंत कटरे, व कनिष्ठ लिपिक अनिल  जोंग, प्रविण गुरव यांना अटक केली होती. लाचखोरी प्रकरणात सापडल्यामुळे डॉ. कटरे यांच्याकडे शिक्षण सहसंचालकाचा अतिरिक्त कार्यभार शिक्षण विभागाने संपुष्टात आणला होता. आणि या पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. अशोक उबाळे यांच्याकडे देण्यात आला. उबाळे यांनी सोमवारी यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला. तर कटरे यांना त्यांच्या मूळ जागी म्हणजे राजाराम कॉलेज येथे सहयोगी प्राध्यापक पदावर पाठविण्यात आले.