Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षकांचे आंदोलन, निवेदन स्वीकारायला वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित ! आमदारांनी केला जिल्हा प्रशासनाला निषेध !!आठ थर अन् ट्रिपल एक्क्याची कमाल…शिवनेरी गोविंदा पथकाने फोडली युवाशक्तीची तीन लाखाची दहीहंडी सकल मराठा शौर्यपीठाच्यावतीने प्रतिकात्मक दहीहंडीकृष्णराज महाडिकांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावेत, मनसेच्या नादाला लागू नयेकॅम्पस टू कार्पोरेट...बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटमध्ये मायक्रोसॉफ्टकडून मार्गदर्शनसन्मानाच्या दिनीच शिक्षक रस्त्यावर !  जुनी पेन्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !!गोकुळमध्ये महायुतीचा दोन हजाराहून अधिक मतांनी विजय, ठरावधारकांनी सहलीवर जायची तयारी ठेवावी - हसन मुश्रीफश्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गोकुळ शॉपीचे उद्घाटन‘टाइम टू मार्केट’ साधणाराच खरा उद्योजक, ग्रीन हायड्रोजनमध्ये मोठी संधी : कुलगुरू डॉ. राजनीश कामतराजू शेट्टी हे स्टंटबाज आंदोलक, सतेज पाटलांनी माझ्या मंत्रीपदाची काळजी करू नये - आमदार राजेश क्षीरसागर

जाहिरात

 

शिक्षकांचे आंदोलन, निवेदन स्वीकारायला वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित ! आमदारांनी केला जिल्हा प्रशासनाला निषेध !!

schedule05 Sep 26 person by visibility 21 categoryशैक्षणिक

 

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : एक नोव्हेंबर २००५ पूर्वी कायम सेवेत असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्श्नन योजना लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन योजना समन्वय संघातर्फे शनिवारी, पाच सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मात्र निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी असे वरिष्ठ अधिकारी कार्यालयात नव्हते. यावरुन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी जिल्हा प्रशासनाचा निषेध केला.

दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघाला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमदार जयंत आसगावकर, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, शिक्षक नेते दादासाहेब लाड, भरत रसाळे, खंडेराव जगदाळे, बाबासाहेब पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने, कागलच्या नगराध्यक्ष सविता माने, बी जी बोराडे, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार,  मुख्याध्यापक संघाचे माजी चेअरमन सुरेश संकपाळ, माजी सचिव दत्ता पाटील, प्राचार्य दत्तात्रय घुगरे, मीनल पाटील, महानंदा घुगरे, विजय शिरोळकर, मदन कदम आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाकडे निवेदन दिले.याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसिलदार नम्रता शिराणे उपस्थित होते. त्यांनी निवेदन स्वीकारले. याप्रसंगी आमदार जयंत आसगावकर यांनी,‘ शिक्षकांचा मोर्चा व निवेदन देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांना पूर्वकल्पना दिली होती. हजारो शिक्षक आज रस्त्यावर उतरले. लोकशाही मार्गाने आंदोलन केले. शिक्षकदिनी शिक्षकांवर आंदोलनाची वेळ आली. निवेदन स्वीकारण्यासाठी एकही वरिष्ठ अधिकारी नाही. निवासी उपजिल्हाधिकारी अनुपस्थित कसे काय राहू शकतात. जिल्हा प्रशासनाचा निषेध करत आहे.’अशा भावना व्यक्त केल्या. दादासाहेब लाड यांनीही आंदोलनासंदर्भात अगोदर कळवूनही एकही वरिष्ठ अधिकारी कसे काय उपस्थित नाहीत असा प्रश्न केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes