+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही !
Screenshot_20240226_195247~2
schedule02 Sep 22 person by visibility 438 categoryआरोग्य
संचालक,अधिकाऱ्यांना घेत जनावरांच्या गोठयाला भेट महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे, चौगलेवाडी येथील दूध उत्पादकांच्या जनावरांना लागण झालेल्या लंम्‍पीस्कीन त्‍वचारोग' ची लागण झाली आहे‌‌. हा प्रकार समजतात कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाचे चेअरमन विश्वास पाटील हे सहकारी संचालक व वैद्यकीय अधिकारासोबत त्या जनावरांच्या गोठ्यावर पोचले. लंम्पीस्कीन त्‍वचारोग बाधित  जनावराची पाहणी केली. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचाराच्या अनुषंगाने सूचना केल्या.
 संघाचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले, लंम्‍पीस्कीन हा रोग जनावरांच्या त्वचेसंबंधित आजार असून हा संसर्गजन्य रोग आहे. त्याचा प्रसार झपाट्याने होत आहे. यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनावर परिणाम होत आहे. तसेच अति प्रमाणात लागण झालेले जनावर दगावण्याची शक्यता आहे. यामुळे दूध उत्पादकांनी आजारी जनावरे व इतर जनावरे एकाच गोट्यातून बाजूला करावीत. दूध उत्पादकानी आजारग्रस्त जनावरांची सेवा करताना हात मोजे वापरावेत अशा सूचना दिल्या तसेच संघाच्या व सरकारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्याने औषध उपचार करणे फार गरजेचे आहे.हा आजार रोखण्यासाठी गोकुळचे वैद्यकीय पथक तयार करून उपयायोजना त्या दूध उत्पादकांच्या गोठ्यावर जाऊन उपचार केले जाणार आहेत.तसेच संघाशी सलग्न सर्व दूध संस्थाना या त्वचारोगाबद्दल माहिती व त्यावर उपाय असलेले परिपत्रक संघाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत संस्थाना पाठवले जाणार आहे.
अतिग्रे येथील चौगलेवाडी येथील अजित विलास चौगुले, दादा चौगुले, आदित्य काकासो चौगुले, दिनकर रामू पाटील, उदय श्रीधर पाटील, सखाराम गोपाळ मुसळे, काकासो कल्लाप्पा चौगुले, चंद्रशेखर माणिक पाटील या दूध उत्पादकांच्या गोठ्यावर जाऊन जनावरांची पाहणी केली. यावेळी पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.यु.व्ही.मोगले, सहायक व्यवस्थापक डॉ.पी.व्ही.दळवी, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, दूध संकलन अधिकारी आर.एन. पाटील, विस्तार पर्यवेक्षक विक्रम पाटील यांच्यासह गावातील दूध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते