+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustराजेश क्षीरसागर धावले पूरग्रस्तांच्या भेटीला, भर पावसात विविध ठिकाणांची पाहणी adjustकाँग्रेसकडून सतेज पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी ! समन्वय समितीत स्थान ! adjustजयंती नाल्यावर पाणी, वाहतुकीसाठी मार्ग बंद adjust४०९ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी ! सीईओंनी शब्द पाळला, शिक्षणाधिकाऱ्यांचे गतीमान कामकाज !! adjustपावसाचा रपाटा- पाण्याचा विळखा कायम ! घरांची पडझड, नागरिकांचे स्थलांतर!! adjustकास्ट्राइब शिक्षक संघटना कोल्हापूरतर्फे आरक्षण दिन साजरा adjustपूरग्रस्त कुंभार समाजाच्या मदतीसाठी भाजपाची जिल्हा प्रशासनाकडे धाव adjustभारतीय मजदूर संघाचा ६९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा adjustजबाबदारीने पेलतेय तरुण पिढी शिक्षण संस्थांची कामगिरी adjustदेवराज बोटिंग क्लबने रंकाळा तलावातील कचरा हटविला
1000653813
1000630884
1000621806
1000615695
schedule04 Mar 24 person by visibility 425 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जिल्ह्यात श्वान दंश घटनेत २०२२ ते २०२४ जानेवारी अखेर वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन स्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आरोग्य विभागामार्फत जिल्हा परिषद फंडातुन दरवर्षी ७० ते ८० लक्ष रुपयांच्या प्रतिबंधक लसीची व्यवस्था केली जाते. होणारा खर्च लक्षात घेता श्वान दंशावर नियंत्रण आणून खर्च नियंत्रणात आणल्यास याकारणासाठी वापरला जाणारा निधी इतर आरोग्य विषयक सोयी सुविधा देण्यासाठी उपलब्ध होईल. यासाठी प्रशासन व लोकसहभागातून एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी राजेश गायकवाड यांनी केले आहे.
श्वान दंश लस वर्गीकरण -वर्ग १ -प्राण्यांना स्पर्श किंवा आहार देणे, अखंड त्वचेवर चाट, लाळेद्वारे संपर्क / पिसाळलेले प्राणी / मानवी मलमुत्र संपर्कात- लस देण्याची आवश्यकता नाही
वर्ग २ - खरचटलेल्या किंवा रक्तस्त्राव न झालेल्या जखमा- फक्त रेबीज लस देण्याची आवश्यकता आहे. तर वर्ग ३ - एक किंवा अनेक खरचटलेले व चाव्याद्वारे झालेल्या जखमा, लाळेद्वारे त्वचेशी संपर्क- रेबीज व रेबीज इम्युनोग्लोबीन लस देण्याची गरज आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत कुत्रा किंवा इतर प्राणी चावल्यामुळे झालेली जखम साबण आणि नळाच्या वाहत्या पाण्याने स्वच्छ धुवा. जखमेला निर्जंतुक मलम लावा. जखमेला मिर्ची, तेल, चुना असे कोणतेही घातक पदार्थ लावू नका. ताबडतोब शासकीय दवाखान्यात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने रेबीज विरोधी लस घ्या. लसीच्या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करावे. आपल्या घरातील पाळीव प्राण्यांचे वेळोवेळी लसीकरण करावे. भटक्या श्वानांवर सनियंत्रण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या समन्वयाने निर्बीजीकरण करण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करणे. 
व्यापक जनजागृती .....
पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर त्याचा चावा मानवी शरीरास किती प्रमाणात केला आहे यावरुन वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानेच लस घ्यावी अन्यथा टाळावी. गाय, म्हैस इ. दुध देणाऱ्या जनावरास पिसाळलेला कुत्रा चावल्यास त्या जनावराच्या दुधामुळे कोणतीही हानी होत नाही याबाबत जनतेमध्ये गैरसमज दिसुन येतो. श्वान दंश झाल्यावर गावठी औषधांचा वापर न करता जवळच्या सरकारी दवाखान्यात दाखवूनच पुढील उपचार घ्यावेत, असेही आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे.