Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सचिनच्या प्रचारार्थ आबाजींचा झंझावात! मतदारांत विश्वास…कार्यकर्त्यांत उत्साह ! !दालन प्रदर्शन पाहण्यास गर्दी उसळली…प्रार्थना बेहरेंनी साधला संवाददि न्यू एज्युकेशन सोसायटीचा १०५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरायाज्ञसेनी पाटील यांच्यासह भाजपच्या उमेदवारांना विजयी करुन अशोक पाटील कुटुंबींयांना न्याय द्या : खासदार धनंजय महाडिकमाहिती विभागाचे छायाचित्रकार अनिल यमकरांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार सतेज पाटील समर्थक प्रदीप झांबरेंचा भाजपमध्ये प्रवेश ! मुडशिंगीत काँग्रेसला धक्का !!सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री महापालिकेसाठी महायुतीचा पद वाटपाचा फॉर्म्युला ठरला ! रविवारी अधिकृत घोषणा !!युवक - युवतींसाठी काम, महिला सक्षमीकरणाला प्राधान्य : शिवसेनेचे उमेदवार सचिन पाटीलशिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी भली मोठी रांग ! कुलगुरू. आजी-माजी प्रकुलगुरु, अधिष्ठातांचा समावेश ! !

जाहिरात

 

याज्ञसेनी पाटील यांच्यासह भाजपच्या उमेदवारांना विजयी करुन अशोक पाटील कुटुंबींयांना न्याय द्या : खासदार धनंजय महाडिक

schedule01 Feb 26 person by visibility 17 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " दिवंगत सरपंच अशोक पाटील हे पाचगावच्या विकासासाठी झटणारे व्यक्तिमत होते. भारतीय जनता पक्षाने त्यांच्या स्नुषा अॅड. याज्ञसेनी महेश पाटील यांना जिल्हा परिषद मतदार संघातून उमेदवारी देत न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. या जिल्हा परिषद मतदारसंघांतील मतदारांनी याज्ञसेनी पाटील यांच्यासह  भाजपच्या पंचायत समितीच्या उमेदवारांना निवडून देत अशोक पाटील यांच्या कुटुंबीयांना न्याय द्या.” अशी भावनिक साद खासदार धनंजय महाडिक यांनी घातली.

 पाचगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार अॅड. याज्ञसेनी महेश पाटील, पाचगाव पंचायत समितीच्या उमेदवार दिपाली संजय पाटील आणि उजळवाडी पंचायत समितीच्या उमेदवार वैशाली सुतार यांच्या प्रचारार्थ रविवारी एक फेब्रुवारी रोजी पाचगाव येथे प्रचार सभा आयोजित केली होती. शांतीनगर बस स्टॉप येथील हनुमान मंदिर समोर आयोजित या सभेला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
 खासदार महाडिक म्हणाले, " पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखालील अनुक्रमे केंद्र व राज्य सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेचा जीवनमान उंचावण्याचा उंचावला आहे. लाडकी बहीण योजना, हर घर हर जल योजना, जनधन खाती,  लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा करणे, शेतकऱ्यांना अनुदान प्रधानमंत्री आवास योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून लोकांच्या हिताचा  कारभार केला. याउलट काँग्रेसने सत्ता असताना देशाला लुबाडण्याचे काम केले. फेक नरेटिवह सेट करण्यात काँग्रेसचे नेते मंडळी पटाईत आहेत. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत जनतेने काँग्रेसला बाजूला केले. कोल्हापूर जिल्हा परिषदेतील महायुतीची सत्ता येणार आहे महायुतीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल. काँग्रेसच्या नेत्यांच्या भूलथापांना बळी न पडता नागरिकांनी भारतीय जनता पक्षाच्या माहितीच्या उमेदवारांना विजयी करावे. " भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, प्रा. जयंत पाटील , नगरसेवक विजय देसाई यांची भाषणे झाली. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनीषा वासकर, संजय वासकर, भिकाजी गाडगीळ, सचिन पाटील सौरभ गाडगीळ उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes