जिल्हा परिषदेत अजित पवार यांची जयंती साजरी
schedule22 Jul 26 person by visibility 45 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : माजी उपमुख्यमंत्रीअजित पवार यांची जयंती जिल्हा परिषदेत साजरी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत व उपाध्यक्ष तानाजी पाटील यांच्या हस्ते पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती जॅसमिन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापती सारिका नांदेकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती विद्या पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्यासह जिल्हा परिषदेतील सर्व खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिक्षिका श्रीमती सुषमा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अभिवादन केले.