Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चाळीस वर्षे सेवा..कॉलेजवरील गेटवरचा शेवटचा निरोप…शिपाई मामांनी मारली सचिवांना मिठीकिरीट सोमय्या ना आमदार- ना खासदार, महापालिकेत येऊन बैठक घेण्याचा त्यांना काय अधिकार ? काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा हल्लाबोलप्रा. महेश वासुदेव गावडे यांना पीएचडीशिष्यवृत्तीतील यशानंतर आता गुणवत्तावाढीचे नवे लक्ष्य : सभापती शितल यादवकौशल्य विकासासाठी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन-  शिवाजी विद्यापीठात लवकरच सामज्यंस करार -कुलगुरू डॉ.राजनीश कामतएसआयआर प्रक्रियेत गंभीर त्रुटी, नोंदणीसाठी मुदतवाढ हवी : काँग्रेसच्या नगरसेवकांनी घेतली जिल्हा प्रशासनाची भेटगव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेच्या अध्यक्षपदी रवींद्र पंदारे, उपाध्यक्षपदी विलासराव कुरणेआता प्रशासक राजवट नाही –कामकाजात सदस्यांना विश्वासात घ्या, अध्यक्षांचे खडेबोल ! शिक्षणाधिकारी रजेवर !सहकार सप्ताहनिमित्त गोकुळमध्ये वृक्षारोपण, अधिकारी - कर्मचाऱ्यांसाठी व्याख्यानगोकुळची बदनामी थांबवा, शेतकरी कुटुंबांतील मुलगा करणार आत्मक्लेश आंदोलन

जाहिरात

 

शिष्यवृत्तीतील यशानंतर आता गुणवत्तावाढीचे नवे लक्ष्य : सभापती शितल यादव

schedule07 Jul 26 person by visibility 62 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘शिष्यवृत्ती परीक्षेतील यश ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र, यावर न थांबता प्रत्येक जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावणे, प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत कोल्हापूर जिल्ह्याला राज्यात अग्रस्थानी नेणे हे आता आपले नवे लक्ष्य आहे’ अशा सूचना शिक्षण व अर्थ समितीच्या सभापती शितल यादव यांनी केल्या. तसेच पूर परिस्थिती निर्मांण झाली आहे  ओढे,नाले,ओसंडून वाहत आहेत अशा वेळी विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास कोणतीही अडचण निर्माण होऊ नये याची खबरदारी घ्यावी असेसही त्यांनी सांगितले

शिक्षण समिती सभापती यादव यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची मासिक सभा झाली. यावेळी त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच गुणवत्तावाढीसाठी नियोजनबद्ध काम करून प्रत्येक शाळेत उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या सूचना दिल्या.

माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी उपस्थितांचे स्वागत करून सरकारी निर्णय व परिपत्रकांचे वाचन केले. त्यानंतर सेमी इंग्रजी शाळा, वर्ग मंजुरी, नवीन वर्गवाढ मंजुरी, शाळांचे निर्लेखन, शिक्षक पदस्थिती तसेच इतर विविध शैक्षणिक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सदस्य अमरसिहं चव्हाण यांनी जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढीकडे अधिकाधिक लक्ष देणेबाबत सूचना दिल्या. शिक्षणाधिकारी सावंत  यांनी तालुक्यामधील शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरु करणेबाबत प्रस्ताव दयावेत. अशा सूचना दिल्या. सदस्य एकनाथ पाटील यांनी पदोन्नती, निवडश्रेणी जरूरत्या शिक्षण विभागाकडील प्रलंबित विषयाकडे लक्ष वेधले.  सदस्या रेखा मुगडे यांनी करवीर तालुक्यातील निर्लेखन शाळेची विकट परिस्थिती तसेच शाळेची शौचालय. पाण्याची टाकी बदल करण्यासंबंधी सूचना दिल्या. सभेला शिक्षण समिती सदस्य स्नेहल वेल्हाळ, उत्तरा शिंदे, शुभांगी कुंभार, भगवान पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर या सोमवार सहा जुलैपासून तीन दिवस रजेवर आहेत. यामुळे प्राथमिक शिक्षणाधिकारीपदाचा तात्पुरता कार्यभार माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्याकडे देण्यात आला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes