Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळची बदनामी थांबवा, शेतकरी कुटुंबांतील मुलगा करणार आत्मक्लेश आंदोलनप्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी बाबू धोंडीबा परीटअ‍ॅड. विवेकानंद घाटगे यांचा बुधवारी ग्रंथतुला करुन जाहीर सत्कारशिष्यवृत्ती परीक्षेत महापालिका शाळा ठरल्या जिल्ह्यात अव्वलदुग्धजन्य पदार्थांच्या मूल्यवर्धनासंबंधी संशोधन, डॉ. ज्ञानेश्वर पंतगे यांच्या संशोधनाला पेटंटमहाराष्ट्र न्यूज वनवर शुभेच्छांचा वर्षाव, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून दिवसभर सदिच्छा !भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन करवीर तालुकाध्यक्षपदी मन्सूर सय्यदबदलत्या मानसिकतेची नवी पहाट, उच्चशिक्षित इंजिनीअर मुलीने केले शेतकरी मुलासोबत लग्न !!यशस्वितेचा षटकार ! महाराष्ट्र न्यूज वनचे सातव्या वर्षात पदार्पण ! !सहकार गौरव पुरस्कार सोहळा; आमदार विनय कोरे यांना सहकार भूषण पुरस्कार ! विद्याधर अनास्कर ठरले सहकार महर्षी !!

जाहिरात

 

गोकुळची बदनामी थांबवा, शेतकरी कुटुंबांतील मुलगा करणार आत्मक्लेश आंदोलन

schedule06 Jul 26 person by visibility 120 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हयातील शेतकरी व दूध उत्पादकांचा आर्थिक कणा समजल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी व विरोधक बदनामी करत आहेत. लहान भाऊ, मोठा भाऊवरुन संघर्ष सुरू आहे. कोण गोकुळचा बाप ठरवित आहेत. गोकुळमध्ये कोणी लहान व मोठा भाऊ नाही. गोकुळचा कोणी बाप नाही. गोकुळ दूध संघ हा दूध उत्पादकांचा आहे. तेव्हा गोकुळची बदनामी थांबावी म्हणून, राजकारणासाठी कोणी गोकुळला बदनाम करु नये यासाठी मुदाळ तिट्टा येथील डॉ. युवराज येडूरे हे बुधवारी, आठ जुलै २०२६ रोजी आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात शेतकरी आपल्या गाय व म्हैस घेऊन सहभागी होणार आहेत अशी माहिती डॉ. येडुरे यांनी दिली.

गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध प्रकल्प नजीकच्या चौकात सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत आंदोलन होणार आहे. हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती, राजकीय पक्ष किंवा संघटनेविरोधात नाही. हे आंदोलन केवळ गोकुळच्या हितासाठी, दूध उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत जनजागृती निर्माण करण्यासाठी आहे. मी, शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. गोकुळला राजकारणापलीकडे जाऊन सहकाराच्या दृष्टीने पाहावे आणि या संस्थेची प्रतिष्ठा जपण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी असे डॉ. येडुरे यांनी सांगितले. गोकुळ ही कोणत्याही एका व्यक्तीची किंवा राजकीय गटाची मालमत्ता नाही. ही लाखो दूध उत्पादकांची सामूहिक संपत्ती आहे. अल्पभूधारक, भूमिहीन, लहान शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा हा कणा आहे. त्यामुळे या संस्थेची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि स्वायत्तता कायम राखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 गोकुळचे संस्थापक स्वर्गीय एन. टी. सरनाईक, गोकुळच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणारे आनंदराव पाटील चुयेकर यांचे स्मरण करत येडुरे म्हणाले, ‘ आजपर्यंत गोकुळच्या उभारणीत योगदान देणारे सर्व माजी व विद्यमान संचालक, अधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक, वितरक आणि ग्राहक यांच्याप्रती मी एक दूध उत्पादक म्हणून आमची इच्छा एकच आहे—गोकुळ आणखी मोठे व्हावे.’पत्रकार परिषदेला प्रकाश पाटील, राहुल पाटील, विश्वजीत पाटील, संदीप पाटील, विजय गुजर, बाळासो रामाणे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes