Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मम ततढढ चचराजर्षी शाहू जन्मस्थळ संग्रहालयाचा शनिवारी लोकार्पण सोहळावाढदिवसाला विधायक उपक्रमांची जोड, सुरेंद्र जैन यांचा आदर्शवत पायंडानिसर्गाची हानी न करता केलेला विकास हा खऱ्या अर्थाने शाश्वत विकास – कुलसचिव व्ही. एन. शिंदेकेआयटीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील पायोनियर स्पर्धा, सहा हजार स्पर्धकांचा सहभागगुरुवारपासून रमजान रोजे, हिलाल कमिटीची बैठकडॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव स्वीकृत नगरसेवकवरुन राजकारण गाजण्याची चिन्हे, उट्टे काढण्याच्या पावित्र्यात कदम !महापौर दररोज सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत महापालिकेत ; शहर स्वच्छतेसाठी विशेष मोहीम

जाहिरात

 

वाढदिवसाला विधायक उपक्रमांची जोड, सुरेंद्र जैन यांचा आदर्शवत पायंडा

schedule19 Feb 26 person by visibility 45 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन, प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापुरातील प्रसिद्ध उद्योगपती आणि कोल्हापूर फर्स्टचे प्रमुख सुरेंद्र जैन यांनी विधायक उपक्रमांची जोड देत वाढदिवस साजरा केला. गेली चार वर्षे ते वाढदिनी सामाजिक संस्थांना मदत करत आहेत. यंदाही, वाढदिवसाचे औचित्य साधून जैन यांनी सातारा जिल्ह्यातील परळी (सज्जनगड, जि.सातारा) येथील  श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजला पाच लाख रुपयांचा धनादेश दिला. या रकमेच्या माध्यमातून शाळा दुरुस्ती करण्यात येणार आहे. रेसिडेन्सी क्लब येथे आयोजित स्नेहमेळाव्यात जैन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती.

 सामाजिक उपक्रम असोत की संस्थात्मक काम कारखानदार जैन यांचा नेहमीच पुढाकार असतो. सामाजिक बांधिलकी मानून ते वेगवेगळया पातळीवर कार्यरत असतात. १९ फेब्रुवारी रोजी त्यांचा वाढदिवस.यानिमित्त जैन परिवाराने स्नेहमेळावा आयोजित केला होता. पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले. यानंतर आयोजित सदिच्छा समारंभात  मान्यवरांनी जैन यांना वाढदिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. आमदार अशोकराव माने,  विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनचे बाळ पाटणकर, विनोद कुमार लोहिया, ऋतुराज इंगळे, कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, बाबासो कोंडेकर, प्रताप कोंडेकर, नितीन वाडीकर, प्रदीप कापडिया, मोहन कुशिरे, विठृठल पाटील, हरिश्चंद धोत्रे, हॉटेल व्यावसायिक सचिन शानबाग, सिद्धार्थ लाटकर, चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष राजू पाटील, अजित कोठारी, धनंजय दुग्गे, राहुल नष्टे, कारखानदार सारंग जाधव, राहुल पाटील, कुशल सामानी, प्रसन्न तेरदाळकर, संजय अंगडी, हर्षद दलाल, अमर करांडे, जयदीप चौगुले, संजय पेंडसे, किरण वसा, एम.वाय.पाटील, शांताराम सुर्वे, रामराजे बदाले, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, डॉ. अण्णासाहेब गुरव, राहुल चिकोडे, विनोद कांबोज, अशोक रोकडे, जयदीप पाटील, सचिन बीडकर, प्रदीप व्हरांबळे आदींनी जैन यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी बोलताना सुरेंद्र जैन यांनी, ‘आपण समाजाचे एक घटक आहोत. समाजाप्रती आपली काही कर्तव्ये आहेत. या भावनेतून आपण कार्यरत असतो. २०२३ पासून वाढदिनाचे औचित्य साधून विविध सामाजिक संस्थांना मदतीचा हात देत आहे. गरजू व हुशार विद्यार्थ्यांना पाठबळ दिले आहे. यंदा, सातारा जिल्ह्यातील परळी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या इमारत बांधकामासाठी मदत केली जाणार आहे.’असे सांगितले. जैन यांनी या हायस्कूलच्या बांधकामासाठी एकूण वीस लाख रुपयांच्या अर्थसहाय्याची घोषणा केली आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या या हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा आहे. विवेकानंद शिक्षण संस्थेचे सातारा जिल्हा विभागप्रमुख प्राचार्य शशिकांत काटे,गजानन बोभडे, हायस्कूलचे प्राचार्य अशोक कदम, नारायण पंडित,सरपंच बाळकृष्ण कदम, उपसरपंच नंदकुमार धोत्रे यांनी पाच लाख रुपयांचा धनादेश स्वीकारला. दरम्यान सुरेंद्र जैन व परिवाराने साऱ्यांचे स्वागत केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes