बलिदान मासाला विरोध करणाऱ्यांवर कारवाई करावी-हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची निदर्शने
schedule04 Mar 25 person by visibility 279 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : बलिदान मासाला विरोध करणाऱ्या शिक्षक व राजकीय कार्यकर्त्यावर कारवाई करावी यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन दिले. सरवडे येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी बलिदान मास पाळला. बलिदान मास पाळणाऱ्या विद्यार्थ्यांवर शिक्षकांनी आक्षेप घेतला. याप्रश्नी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी विचारणा केली होती. विचारणा करणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचे दुकान राजकीय कार्यकर्त्यांकडून फोडण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी त्या शिक्षक आणि राजकीय कार्यकर्त्यांवर कारवाई करावी यासाठी हिंदुत्ववादी संघटनेतर्फे सोमवारी, जिहाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन झाले. हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, उदय भोसले, गजानन तोडकर, अनिरुद्ध कोल्हापुरे, सुनील घनवट, शिवानंद स्वामी, किशोर घाटगे, कुंदन पाटील, आशिष लोखंडे, सुरेश यादव आदींचा आंदोलनात सहभाग होता.