Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची कोल्हापुरात शनिवारी बैठकउद्धव ठाकरेंची भेट, पण नाराजी कायम ! प्रामाणिकपणाचे फळ म्हणून जिल्हाप्रमुखपदी निवड-रविकिरण इंगवलेसावकार मादनाईक भाजपात दाखल, शिरोळमध्ये भाजपाला मिळाला नवा नेताविद्यापीठातील औद्योगिक रसायनिक शास्त्रमधील विद्यार्थ्यांची निवड आर्थिक विकासासाठी आर्थिक साक्षरता शिस्त महत्त्वाची : कुलगुरू डी. टी. शिर्के न्यू वूमन्स फार्मसीचा शंभर टक्के निकालरोहिणीदेवी जयवंतराव घाटगे यांचे निधनडॉ. आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकाचे शनिवारी प्रकाशनगुणीदास फाऊंडेशनतर्फे शनिवारी तीर्थ विठ्ठल भक्तीगीत कार्यक्रम

जाहिरात

 

तर चायनीज गाडी-चिकन विक्रेत्यावर गुन्हा, महापालिकेचा इशारा

schedule07 Mar 24 person by visibility 461 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शहरातील चायनीज गाडी व चिकन विक्रेत्यांनी कचरा उघड्यावर किंवा नाल्यात टाकल्यास त्यांच्या गुंन्हा नोंद होणार आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने यासंबंधी कारवाईचा इशारा दिला आहे. 
शहरातील ठिकठिकाणी असणारे चायनीय गाडी व चिकन विक्रेत्यांनी साठवणूक ठेवलेला कचरा ते रात्रीच्या वेळेस उघडयावर किंवा नाल्यामध्ये टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत शहरातील चायनीज गाडी व चिकन विक्रेते यांनी कचरा साठविण्यासाठी डस्टबीन ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच आरोग्य विभागाचे वॉर्ड निहाय पथके ही नेमन्यात आलेली आहेत. या पथकांमार्फत चायनीय गाडी व चिकन विक्रेत्यांकडून  कचरा उघड्यावर किंवा नाल्यात टाकल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन गुन्हा नोंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. तरी शहरातील सर्व चायनीय गाडी व चिकन विक्रेत्यांनी आपला कचरा त्यांनी ठेवलेल्या डस्टबीन मध्ये साठवून ठेवावा. हा कचरा ज्यावेळी घंटा गाडी येते तेंव्हा त्यांच्याकडे द्यावा असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes