Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विविध ग्रंथांचे प्रदर्शन अन् वाचण्यासाठी मोफत पुस्तके ! विद्यापीठाचा वाचन चळवळीला बळकटीचा उपक्रम !! दर्पण फाऊंडेशनतर्फे किशोरप्रेमींसाठी सांगितिक मैफिलडीवाय पाटील मेडिकल संघाला विजेतेपदराष्ट्रीय रायफल शूटिंगमध्ये आर्यवर्त यादवचे यशसंलग्नीकरण फीमध्ये आता सहा वर्षानी वीस टक्के वाढ, कॉलेजिअसना दिलासा ! अधिसभेची शिफारस !!आनंद माने, सागर डेळेकर. सचिन पाटील, संदीप मगदूमसह पाच जणांना पुरस्कार ! चार जानेवारीला पुरस्कार वितरण !!आता ‘धस’ होतय काळजात ! आय सपोर्ट प्राजक्ता !!वीज कंत्राटी कामगार संघातर्फे प्रकाश आबिटकरांचा सत्कारकुंभी, पंचगंगा कारखान्याचा ऊसदर सर्वाधिक ! खासगीमध्ये दालमिया अव्वल !!शाहू शिक्षण संस्थेतर्फे श्रीपतराव बोंद्रे यांची जयंती साजरी

जाहिरात

 

कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात ८८ सौर प्रकल्प प्रस्तावित

schedule20 Dec 24 person by visibility 55 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात ५४ ठिकाणी (एकूण क्षमता १७० मेगावॅट) व सांगली जिल्ह्यात ३४ ठिकाणी (एकूण क्षमता २०७ मेगावॅट)  सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत. या दोन्ही जिल्ह्यातील प्रकल्पांची एकत्रित क्षमता ३७७ मेगावॅट आहे.

 या प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ७५ कृषी वाहीन्यांवरील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळणार आहे. कमी दाबाच्या (लो व्होल्टेज) तक्रारी देखील दूर होणार आहेत. या योजनेमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसही चालना मिळणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे.

राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू असून सांगली जिल्ह्यातील पहिला चार मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प जत तालुक्यातील बसरगी  येथे कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पामुळे बसरगी, सिंदुर व गुगवाड या गावांतील ११०० शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा शक्य होणार आहे. राज्यात उभारण्यात येणाऱ्या १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या शृंखलेतील हा सांगली जिल्ह्यातील पहिला प्रकल्प आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत जिल्ह्यात जमीन उपलब्ध करून देण्यात जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांचे व त्यांच्या संपूर्ण प्रशासकीय टीमचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. जिल्ह्यातील गायरान जमिनी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने भूमी अभिलेख कार्यालय व जिल्हा परिषद यांचेही विशेष सहकार्य लाभले आहे. अशा सौर प्रकल्पास जागा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायतींना सरकारकडून एकरकमी पाच लाख अनुदान देण्यात येत आहे.

.............................

सौर प्रकल्प ग्राहक हिताचे

“वीज ग्राहक व शेतकरी या सर्वांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प हे फायद्याचे असून यामुळे शेतीकरता दिवसा वीज मिळणार आहे. या प्रकल्पांमुळे येत्या काही वर्षात विजेचे दर कमी होण्यासही हातभार लागणार आहेत. दोन्ही जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीनी या पर्यावरणपूरक विकास कामात आपला सहभाग नोंदवावा. तसेच उपलब्ध असलेल्या जागांवर सौर प्रकल्प उभारण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करून महावितरणला सहकार्य करावे.”

  • स्वप्नील काटकर, मुख्य अभियंता, महावितरण

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes