Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डेप्युटी सीईओ अरुण जाधव, शैलेश पाटणकरची होणार संयुक्त चौकशी ? निलंबनानंतर आता विभागीय चौकशीचा ससेमिरा !डॉ. सतीश पत्की यांना डॉ. अतुल जोगळेकर जीवन गौरव पुरस्कारनिवडणुका झाल्यानंतर गोकुळ केसरी कुस्ती स्पर्धा –नविद मुश्रीफकेएमएच्यावतीने दोन दिवसीय केएमकॉन वैद्यकिय परिषद, ७०० प्रतिनिधींचा सहभाग स्मॅकच्या चेअरमनपदी जयदीप चौगले, व्हाईस चेअरमनपदी भरत जाधवसध्याच्या युगात वाचकांचे प्रबोधन करणारी पत्रकारिता गरजेची- लक्ष्मीकांत देशमुखछोट्या गावातील मुलीची मोठी स्वप्नं, बाई तुझ्यापायी नवीन वेबसिरीजमहापालिका निवडणुकीसाठी 11 नोव्हेंबरला आरक्षण सोडतडाॅ. बापूजी साळुंखे इंजीनियरिंग इन्स्टिट्यूटमध्ये तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदगुजरीतील छोटे दुकान ते शिरोलीत दागिने उत्पादन कारखाना

जाहिरात

 

कागल-पेठनाका राष्ट्रीय महामार्गावरील नवीन कामांना शंभर कोटी-धैर्यशील माने

schedule20 Sep 24 person by visibility 506 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन  प्रतिनिधी, कोल्हापूर : कागल ते पेठनाका दरम्यानच्या रस्त्यावर भुयारी मार्गाचे व सेवा रस्त्यांचे काम नव्याने समाविष्ट करून त्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली .
 शेतकरी, शालेय विद्यार्थी व नागरिक यांनी खासदार धैर्यशील माने यांच्याकडे राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्गांची मागणी केली होती.यावेळी खासदार माने यांनी संबंधित रस्त्याची पाहणी विद्यार्थी , शेतकरी, नागरिक यांच्या समवेत केली होती .यावेळी सदर मागणी उचित असल्याचे सांगत संबंधित अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याची सूचना त्यांनी दिली होती. दरम्यान,कामासाठी त्यांनी  रस्ते व दळणवळणमंत्री  नितीन गडकरी यांच्याकडे खासदार माने यांनी नवीन कामे समाविष्ट करण्याबाबत मागणी करून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.अखेर खासदार माने यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले.
          यामध्ये शिरोली येथील शिरोली शाळा ते महाडीक बंगला येथे नवोन भुयारा मार्ग, मंगरायाचीवाडी येथील भुयारी मार्गाचा उंची व रुदी वाढविण्यास मजुरी, किणी हायस्कूल ते माळी वसाहत नवीन भुयारा मार्ग, घुणकी येथे वारणा नदीच्या पुराचे पाणी पास होण्यासाठी पूर्वीचे तोन व नवीन तीन वॉटर अंडरपासचे मंजुरी,त्याचबरोबर घुणका ओढ्याच्या पुलापासून महामार्गाच्या दोन्ही बाजूस शेतकऱ्यांच्या शेतीमाल व ऊस वाहतुकीसाठी नवीन वारणा नदी पुलापर्यंत नवीन सेवा रस्ता , कणेगाव फाटा येथे नवीन बायपास रस्ता त्याचप्रमाणे गोकुळ शिरगाव येथील छोटा भुयारी मार्ग तर उजळाईवाडी व सरनोबतवाडी येथील नवीन बायपास मार्गास नव्याने मंजुरी मिळाली असल्याची माहिती खासदार माने यांनी दिली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes