अतिरिक्त आयुक्त अडसूळ, जाधव यांच्या बदल्या ! शिल्पा दरेकरांची बदली !!
schedule19 Mar 24 person by visibility 2089 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ केशव जाधव व उपयुक्त शिल्पा दरेकर यांच्या बदल्या करण्यात आले आहेत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर या बदल्या झाल्या शिल्पा दरेकर यांचा महापालिकेतील तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. तर अडसूळ व जाधव हे मोर्चे जिल्ह्यातल्या असल्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या बदल्या झाल्या. त्यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर अजून नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्त झाल्या नाहीत. महापालिकेतील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एकाच वेळी बदल्या झाल्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच घटना होय. नगर विकास विभागाने मंगळवारी १९ मार्च रोजी या तीन अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश काढला. मात्र त्यांच्या नियुक्ती केल्या आहेत हे अद्याप स्पष्ट झाले नाही