महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेच्यावतीने 'शिव-शाहू' चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार २५ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर ही स्पर्धा रंगणार आहे.
स्पर्धेतील उद्घाटनचा सामना सोमवारी (दि.२५) दुपारी चार वाजता, संध्यामठ तरुण मंडळ विरुध्द प्रॅक्टीस फुटबॉल क्लब यांच्यात होणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघास एक लाख रुपये आणि शिव- शाहू चषक बक्षीस देण्यात येणार आहे.उपविजेत्या संघास ६० हजार रुपये व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकाच्या संघांना प्रत्येकी १५ हजार रुपये अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत. तसेच वैयक्तीक कामगिरी करणाऱ्या गोलकिपर, बचावपटू, मध्यफळीतील व आघाडी फळीतील उत्कृष्ठ खेळाडूंना प्रत्येकी १० हजार रुपांची भेट वस्तू, सामनावीरास १५०० रुपयांची भेट वस्तू देण्यात येणार आहे. याशिवाय महिला प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून पैठणी साडी आणि पुरुष प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून विशेष कुपण दिले जाणार आहे. फुटबॉलप्रेमींनी याचा लाभ घेण्याचे आवाहन स्पर्धा समितीचे अध्यक्ष अनिल निकम व सहकाऱ्यांनी केले आहे.