महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची पुणे येथील राज्य पोलीस दलाचे समादेशक म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर महेंद्र कमलाकर पंडित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महेंद्र पंडित हे कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून आदेश निघाले आहेत. पंडित हे मुंबई शहर पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. दरम्यान शैलेश बलकवडे यांनी गेल्या तीन वर्षांमध्ये गुन्हेगारीवर वचक बसवला होता गुन्हेगारी टोळ्यावर मोक्काची कारवाई केली होती. त्यांच्या कारकर्दीत अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा तपास झाला होता. बलकवडे यांनी सप्टेंबर 2020 मध्ये कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक म्हणून सूत्रे स्वीकारली होती. दरम्यान नवीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित हे मूळचे सिन्नर येथील आहेत. 2013 मध्ये ते आयपीएस झाले. ते सुरुवातीला नांदेड येथे पोलीस उपाधीक्षक होते. गडचिरोली आणि नंदुरबार येथे त्यांनी काम केले आहे. गडचिरोली येथील कामगिरीबद्दल त्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हाने गौरविण्यात आले होते.