राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्हा संघाला उपविजेतेपद
schedule24 May 23 person by visibility 435 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
संभाजीनगर (औरंगाबाद) येथे झालेल्या १६ वर्षाखालील राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्हा संघांची दमदार कामगिरी करताना मुलींच्या गटात जिल्हा संघाने उप विजेतेपद पटकाविले.
अंतिम सामन्यात पुणे संघाबरोबर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत 87 -71 अश्या गुण फरकाने कोल्हापूरचा पराभव झाला व उप-विजेतेपदावर समाधान मानावे लागले. हर्षदा शेळके(15 गुण), जानवी खामकर (10 गुण), तनिष्का जगताप (18 गुण), अनुष्का जमदाडे (10 गुण) व हर्षला पाटील (18 गुण) यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले व संघास उप विजेतेपद मिळवून दिले.
खेळाडूंना जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील, उपाध्यक्ष नितीन दलवाई, हितेश मेहता, सचिव डॉ. शरद बनसोडे, राजेंद्र रायकर यांचे प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय प्रशिक्षक केदार सुतार, उदय पाटील, शुभम मोहिते व दीपाली खांबे यांचे मार्गदर्शन लाभले.