Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
छछ डडडमहायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीची घोषणा, नेते अन उमेदवारांच्या उपस्थितीत घोषणासमविचारी आघाडीतर्फे उमेदवारांची घोषणा, सात संचालकाना पुन्हा उमेदवारीगोकुळसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर, तीन माजी चेअरमन, बारा संचालकांना उमेदवारी  पदवीधरांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करणार हर्षदा देशमुख -जाधवराधानगरीत राष्ट्रवादीत फूट, प्रा. किसन चौगले  काँग्रेसकडे ! समविचारी आघाडीतून उमेदवारी ! !नाना आगळा - नाना वेगळा…नाना जीवाभावाचा !!मुश्रीफसाहेब मला खाणार आहेत की ? मी त्यांना खाणार आहे ? आमदार शिवाजी पाटलांचे धडाकेबाज विधानमहायुतीच्या उमेदवारांची यादी गुरुवारी दहा वाजता जाहीर होणार, मंत्री मुश्रीफ करणार नावांचे ट्विटगोकुळसाठी महायुतीच्या घडामोडी वेगावल्या, तीन मंत्री -खासदार- आमदारांची उपस्थिती ! आमदार शिवाजी पाटील ही बैठकीला!!

जाहिरात

 

राहुल पाटील यांचा विजय निश्चित - डॉ चेतन नरके

schedule07 Nov 24 person by visibility 586 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
स्वर्गीय आमदार पी एन पाटील हे करवीर मतदारसंघाच्या विकासाचे शिल्पकार होते .अरुण नरके व स्वर्गीय पी एन पाटील यांच्या नसानसात निष्ठा ठासून भरलेली होती. त्या जोरावरच त्यांनी सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले.या मतदारसंघात राहुल पाटील व आम्ही हातात हात घालून काम करत असून महाविकास आघाडी चे कार्यकर्ते राहुल पाटील यांना मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन गोकुळचे संचालक डॉ चेतन नरके यांनी केले
कळे जिल्हा परिषद मतदार संघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते या मेळाव्याला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
अडचणीत सापडलेला आणि या परिसराच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला धामणी प्रकल्प अडचणीतून बाहेर काढून त्याला निधी उपलब्ध करून देण्याचे काम पी एन पाटील यांनी केलेले आहे .राहुल पाटील हे नव्या विचाराचे सुसंस्कृत नेतृत्व असून त्यांना उत्स्फूर्तपणे मिळणारा पाठिंबा पाहता त्यांचा विजय निश्चित आहे .मतदारांनी कोणत्याही भूल थापाना बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले .
यावेळी बोलताना विलास पाटील यांनी स्वर्गीय आमदार पी एन पाटील सडोलीकर यांनी अवघ्या पाच वर्षात करवीर विधानसभा मतदारसंघात विकास काय असतो हे दाखवून दिले .चंद्रदीप नरके यांनी दहा वर्षे लोकांना केवळ फसवण्याचे काम केलेले आहे .या मतदारसंघाचा विकास करण्याची ताकद केवळ राहुल पाटील यांच्याकडेच असून चंद्रदीप नरके यांनी दहा वर्षे केवळ भूल थापा लावण्याचे काम केलेले आहे .यावेळी पन्हाळ्यातील जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही.त्यामुळे पन्हाळा तालुक्यातून राहुल पाटील यांना निर्णायक व विजयी मताधिक्य देऊ असे सांगितले .
यावेळी बोलताना करवीर चे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी आपल्या दहा वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीत चंद्रदीप नरके यांनी करवीर मतदारसंघ भकास केला असून कुंभी कारखाना ही कर्जाच्या खाईत लोटला आहे हेच त्यांचे कर्तृत्व आहे .पी एन पाटील हेच धामणी प्रकल्पाचे खरे खुरे शिल्पकार आहेत.   महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील सडोलीकर यांनी स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांचा धामणी प्रकल्पाच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे आगामी काळात हा मतदार संघ राज्यात आदर्श बनवण्यासाठी मी वचनबद्ध आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब मोळे, हंबीरराव चौगले शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश पोवार,विलास पाटील कळे, रणजित पाटील,ज्ञानदेव कांबळे काटेभोगाव,यांची भाषणे झाली.
यावेळी कुंभी कासारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष,संभाजी पाटील(तात्या),गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडेबाळासाहेब मोळे,सुरेश पाटील , एस के पाटील ,पी.डी.पाटील,,सुनील पाटील,माजी सभापती बंकट थोडगे ,रणजित पाटील,शंभूराजे पाटील,शंकर राबाडे,बापू गिरीबुवा,शामराव पाटील,तसेच ए.डी.पाटील),रघुनाथ आवळेकर,,सरदार पाटील,केरबा पाटील,डॉ कोल्हे,अनिल पोवार,संदीप टिक्के,शिवाजी पाटील,कृष्णनाथ कदम,सीताराम सातपुते,,युवराज पाटील(सर),निवास पाटील(सर),सतीश मोळे,बाजीराव पाटील,किरण पाटील, मनोज पाटील,पांडुरंग जाधव यांच्यासह मतदारसंघातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार मनोज पाटील यांनी मानले
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes