सतेज पाटील समर्थकांचे ठरले प्लॅनिंग
schedule10 Nov 21 person by visibility 448 categoryराजकीय
लाईन बझार येथे विवाहितेची आत्महत्या
schedule02 Aug 20 person by visibility 587 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर
कसबा बावडा लाईन बझार, अयोध्या कॉलनी येथील विवाहितेने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. प्रांजली धीरज भोसले (२६, अयोध्या कॉलनी, लाईन बझार) असे मृत महिलेचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. शाहूपुरी पोलिस ठाण्यात आत्महत्येची नोंद झाली आहे. .
प्रांजली भोसले दुपारनंतर घरातील पहिल्या मजल्यावरील खोलीत झोपण्यास गेल्या. सायंकाळी त्या तळमजल्यावर खोलीत आल्या नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावून हाका मारल्या. पण खोलीतून प्राजंली यांनी कोणताच प्रतिसाद न दिल्याने दरवाजा फोडून खोलीत प्रवेश केला असता प्राजंली यांनी फॅनला ओढणीने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे मृतदेहाजवळ मिळालेल्या चिठ्ठीतून माहिती मिळाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.