जिल्हा परिषदेची निवडणूक दोन दिवसात जाहीर ?
schedule30 Dec 25 person by visibility 33 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा येत्या दोन दिवसात होण्याची शक्यता आहे. ३१ डिसेंबर २०२५ किंवा एक जानेवारी २०२६ या दरम्या राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होईल असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. सुप्रीम कोर्टाने ३१ जानेवारी २०२६ पर्यत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात असा आदेश दिला आहे. त्यानुसार राज्य सरकार व राज्य निवडणूक आयोगाकडून कार्यवाही करण्यात आली. पहिल्या टप्यात नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. सध्या महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीपाठोपाठ आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले आहे. येत्या दोन दिवसात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.