Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत १५ दिवसांनी वाढवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणीगोकुळतर्फे संचालक चेतन नरके यांचा सत्कारआगामी काळात लष्करामध्ये महिलाराज : कर्नल हेमंत जोशी  प्रतिष्ठानच्यावतीने यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन१५९ स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण मर्यादेचे उल्लंघन, २८ नोव्हेंबरला पुन्हा सुनावणीही मॅन धर्मेंद्र यांचे कलापूरशी नाते, कोल्हापुरी पाहुणचाराने भारावले होतेऋतुराज पाटलांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे नगरसेवक भेटले प्रशासकांनामतदार यादीतील हरकतीसाठी मुदतवाढ द्या : शिवसेनेची मागणीशिवसेना ठाकरे गटाने घेतली प्रशासकांची भेटमतदार यादीतील चुका दुरुस्त करा, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची मागणी

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठात पिकणार मोत्यांची शेती

schedule28 Feb 24 person by visibility 802 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अभिनव आणि नवोन्मेषी उपक्रमांना सातत्याने पाठबळ देणारे शिवाजी विद्यापीठ आता खऱ्याखुऱ्या मोत्यांची शेती पिकविण्यास सिद्ध झाले आहे. विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागाने घेतलेल्या पुढाकारातून ‘गोड्या पाण्यातील मोती संवर्धन, संशोधन आणि उत्पादन केंद्रा’चे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात उद्घाटन झाले.
कुलगुरू शिर्के यांना सडोली दुमाला येथील मोती उत्पादक व प्रशिक्षक दिलीप कांबळे यांच्याविषयी माहिती समजल्यानंतर त्यांनी प्राणीशास्त्र अधिविभागाला त्यांच्याशी संपर्क साधून अशा प्रकारचे प्रशिक्षण केंद्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी उभारण्याविषयी चाचपणी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार विद्यापीठात हे मोती पिकविणारे केंद्र कांबळे यांच्याच सहकार्यातून उभे राहिले आहे. विभागातील प्राणीशास्त्रज्ञ डॉ. नितीन कांबळे हे त्याचे समन्वयक म्हणून काम पाहात आहेत.
विद्यापीठाचा प्राणीशास्त्र अधिविभाग अनेक वर्षांपासून अनेकविध समाजाभिमुख उपक्रम राबवित आहे. त्याचा विद्यार्थ्यांनाही लाभ होतो आहे. विभागातील रेशीमशेतीचा ‘सॉईल टू सिल्क’ प्रकल्प, फुलपाखरू उद्यान आणि अलिकडच्या काळात सुरू केलेला शोभेच्या मत्स्यउत्पादनाचा प्रकल्प ही याची काही उदाहरणे आहेत. आपल्या विभागातील विद्यार्थी आणि नागरिक यांना सगळे समुद्रीजीव एकाच ठिकाणी पाहता येतील, अशा पद्धतीचे मत्स्यालय उभारण्याचाही मनोदय आहे.
“ही मोत्यांची शेती विद्यापीठ पैशांसाठी करीत नसून ज्ञानसंवर्धनासाठी करीत आहे. पर्ल फार्मिंग या विषयाचा आपल्या अभ्यासक्रमात समावेश करावा आणि किमान दर वर्षी काही उद्योजक, व्यावसायिक आपल्या विद्यार्थ्यांमधून निर्माण व्हावेत, अशा प्रकारे त्यांना प्रशिक्षित करावे,” अशी सूचनाही शिर्के यांनी काढली. यावेळी डॉ. नितीन कांबळे आणि दिलीप कांबळे यांनी कुलगुरूंसह उपस्थितांना मोत्यांचे फार्मिंग कशा प्रकारे करण्यात येते, याचे सविस्तर प्रात्यक्षिक करून दाखविले. कुलगुरूंच्या हस्ते दिलीप कांबळे यांना ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात आला.या प्रसंगी अधिविभाग प्रमुख डॉ. आशिष देशमुख, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, डॉ. एस.आर. यन्कंची, डॉ. माधुरी वाळवेकर, डॉ. सुनील गायकवाड यांच्यासह प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes