Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वीरशैव बँकेच्या अध्यक्षपदी सतीश घाळी, उपाध्यक्षपदी वैभव सावर्डेकर कोल्हापूरच्या क्रिएटिव्ह शिक्षकांचा अभ्यास दौरा, जागतिक स्तरावरील शाळा भेटीचाधूल चेहरे पे थी, लेकिन आईना साफ करता रहा ! मुश्रीफांचा संजय मंडलिकांना उद्देशून टोलानगरसेवकांच्या पसंतीतून गटनेत्याची निवड, घोषणा कोल्हापुरातून नव्हे भाजपा प्रदेशकडून होणारमहापौर - उपमहापौर निवड तीस किंवा ३१ जानेवारीला! महापालिकेने मागविले निवडीसंबंधी मार्गदर्शन ! !शिवसेनेतर्फे शिवसेनाप्रमुखांना अभिवादन, नूतन नगरसेवकांचा सत्कार क्रीडाई कोल्हापूरतर्फे तीस जानेवारीपासून चार दिवसीय दालन प्रदर्शन ! वास्तू विषयक १७० स्टॉल्सचा समावेश ! !भाजपकडून शिराळे, खाडे, देसाई, कुंभारांची नावे चर्चेत ! शिवसेनेचाही महापौरपदावर दावा !!कोल्हापूर - इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव !जिल्हा परिषदेची निवडणूक, कार्यकर्त्यांच्या सन्मानाची ! कार्यकर्त्यांना पद, राजकारणात मोठं करणं हा महाडिक पॅटर्न ! !

जाहिरात

 

नूतन मराठीचा विद्यार्थी गौरव पाटीलला राष्ट्रीय शालेय कुस्तीमध्ये सुवर्णपदक

schedule08 Dec 25 person by visibility 399 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  :  येथील प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीच्या नूतन मराठी विद्यालय हायस्कूलचा विद्यार्थी पैलवान गौरव पाटीलने राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत गौरव पाटील याने ८० किलो ग्रीकोरोमन प्रकारामध्ये महाराष्ट्रासाठी सुवर्णपदकाची कमाई केली. उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि बिहारच्या बलाढ्य मल्लांवर अचूक डावपेच, दमदार ताकद आणि निश्चयाच्या बळावर सलग विजय मिळवून गौरवने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.  शाळेचे मुख्याध्यापक धनंजय बेदरे, क्रीडा विभाग प्रमुख विनय शिंदे, जिमखाना प्रमुख रश्मी भागवत यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.  सेना केसरी पैलवान गुंडाजी पाटील कुस्ती केंद्र कोपार्डेचा गौरव हा पैलवान आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes