जिप पशुसंवर्धन विभागातर्फे पशुपालकांना पुरस्कार, गुरुवारी वितरण समारंभ
schedule25 Mar 25 person by visibility 73 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभागातर्फे आदर्श गोठा पुरस्कार व प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत पशुपालकांना पुरस्कार देऊन गोरविण्यात येते. २०२४-२५ या वर्षातील पुरस्कारप्राप्त पशुपालकांची नावांची घोषणा करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ गुरुवारी (२७ मार्च २०२५) सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदेत होत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहेत अशी माहिती पशुसंवर्धन अधिकारी प्रमोद बाबर यांनी दिली आहे.
पुरस्कारप्राप्त पशुपालकांची नावे पुढीलप्रमाणे : सुमित मारुती पवार –वाघापूर, पांडूरंग आनंद नाईकवाडे -पंडेवाडी-, आनंदा शिवाजी देसाई- तरणी, कृष्णा शिवाजी पाटील - ढोलगरवाडी-, मायाप्पा देवल चिगरे –टाकळीवाडी, धनाजी बबन पाटील –भुयेवाडी, संदीप एकनाथ पोवार- सिद्धनेर्ली, शिवाजी शामराव वडींगेकर -कातळेवाडी-, यशवंत कृष्णा पाटील –मांडुकली, निलेश शशिकांत फाटक- जंगमवाडी, नानासो दत्तात्रय पाटील –वाघवे, लता उत्तम रेडेकर- पेद्रेवाडी.