शिवाजी विद्यापीठ मॅनेजमेंट कौन्सिलच्या दोन जागेसाठी सहा अर्ज
schedule31 Mar 25 person by visibility 228 categoryउद्योग
ा्मरहाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील मॅनेजमेंट कौन्सिलमधील (व्यवस्थापन परिषद) दोन रिक्त जागासाठी सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. सोमवारी, (३१ मार्च २०२५) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. दोन जागासाठी एकूण सहा सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मॅनेजमेंट कौन्सिलसाठी निवडण्यात येणाऱ्या दोन जागेसाठी शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीने मुलाखती दिल्या होत्या. विकास आघाडीकडे मुलाखत दिलेल्या प्रा. डॉ. मंजिरी मोरे-देसाई, शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. एस. पी. हंगेरगीकर, भारती विद्यापीठ फामर्स कॉलेजमधील प्रा. डॉ. मनिष भाटिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघटनेने (सुटा) निवडणूक लढविणार असल्याचे म्हटले आहे. सुटाचे अॅकेडमिक कौन्सिलमधील सदस्य व कुरुंदवाड येथील प्रा. आर. के. निमट, पाटण येथील प्रा. सुनील चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.
विद्यापीठातील जर्नालिझम विभागातील प्रा. डॉ. निशा मुडे यांनी मॅनेजमेंट कौन्सिलसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. दोन जागेसाठी सहा सदस्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. विद्यापीठातील सभा व निवडणूक विभागाकडे ही प्रक्रिया सुरू आहे. कुलसचिव व्ही. एन. शिंदे हे सभा व निवडणूक विभागाचे प्रमुख आहेत. दरम्यान मंगळवारी (१ एप्रिल) अर्जांची छाननी तर चार एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आहे. अॅकेडमिक कौन्सिलची (विद्या परिषद) ११ एप्रिल रोजी बैठक होणार आहे. त्या बैठकीत मॅनेजमेंट कौन्सिलसाठी दोन सदस्य निवडले जातील. जागा दोन आणि उमेदवार जादा यामुळे मॅनेजमेंट कौन्सिलसाठी निवडणूक होणार हे स्पष्ट होत आहे.