दूध विक्रीत गोकुळचा नवा रेकॉर्ड ! कर्मचाऱ्यांनी केला चेअरमनांचा सत्कार
schedule31 Mar 25 person by visibility 139 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गोकुळ म्हणजे गुणवत्ता ! उच्च प्रतीचे दूध आणि दर्जेदार दुग्धजन्य पदार्थ !! ही सर्वदूर ओळख. परिणामी गोकुळच्या दुधापासून दुग्धजन्य पदार्थ या साऱ्यांनाच ग्राहकांची पसंती. यामुळे विक्रीचा आलेख नेहमीच उंचावणारा. सोमवारी (३१ मार्च २०२५) रमजान ईद दिनी गोकुळच्या दूध विक्रीचा नवा उच्चांक झाला. २३ लाख ६३ हजार १७० लिटरर्स दुधाची विक्री झाली. गेल्यावर्षी रमजान ईदला २२ लाख ०१ हजार २४३ लिटर्स दूध विक्री झाली होती. यंदा त्यामध्ये १ लाख ६१ हजार ९२७ लिटर्सची वाढ झाली. गुढीपाडव्यानिमित्य १७ लाख लिटर्स दूध विक्री तसेच श्रीखंड व बासुंदी विक्री मध्ये उच्चांकी वाढ झाली.
दूध विक्रीचा हा उच्चांक झाल्याबद्दल गोकुळ कर्मचारी संघातर्फे चेअरमन अरुण डोंगळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकारी संचालक योगेश गोडबोल यांच्या हस्ते सत्कार झाला. चेअरमन डोंगळे यांनी, रमजान ईद व श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त दूध उत्पादक शेतकरी, ग्राहक, वितरक, व संघाचे अधिकारी- कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
‘कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीतील एका दिवसात झालेली ही सर्वाधिक दूध विक्री आहे. या रेकॉर्ड ब्रेक दूध विक्री आहे. भविष्यात प्रतिदिन २५ लाख लिटर दूध विक्रीचे ध्येय, दूध उत्पादक व ग्राहकांच्या विश्वासाहर्ततेवर तसेच कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून साध्य करू’ असा विश्वास चेअरमन डोंगळे यांनी व्यक्त केला. संघाचे संचालक अमरसिंह पाटील, प्रकाश पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी यांनी केले पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंके यांनी आभार मानले. मार्केटिंग सहायक महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. गोकुळचे मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, संकलन सहायक व्यवस्थापक दतात्रय वाघरे, बी.आर.पाटील, उपेंद्र चव्हाण, लक्ष्मण धनवडे, संग्राम मगदूम उपस्थित होते.