न्यू कॉलेज वनस्पतीशास्त्र विभागाच्या पुढाकाराने कार्यशाळा, वनस्पतींच्या प्रजाती संरक्षणासंबंधी चर्चा
schedule23 Jul 25 person by visibility 65 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू कॉलेज कोल्हापूर मधील वनस्पतीशास्त्स्त्र विभागामार्फत आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभाग, स्पेसीज सर्वायवल कमिशन व वेस्टर्न घाट स्पेशालिस्ट ग्रुप यांच्या संयुक्त विद्यामाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत कोल्हापूर विभागाचे सहायक वन संरक्षक गुरुप्रसाद यांनी सर्व भारतीय वनस्पतींच्या प्रजातींचे अशा प्रकारे मूल्यांकन होणे गरजेचे आहे. याबाबी प्रभावीपणे राबवण्यासाठी संशोधक व धोरणकर्त्यांमध्ये सहकार्याची गरज असल्याचे सांगितले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य पाटील यांनी भाषणात जागतिक तापमान वाढीमुळे जैवविविधतेवर परिणाम होवून त्यांची संख्या सातत्याने घटत असल्याने अशा कार्यशाळांची नितांत गरज असल्याचे प्रतिपादित केले.कार्यशाळेसाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून २७ संशोधक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. कार्यशाळेत विविध प्रजातींच्या संकट स्थितीचे मूल्यांकन कसे करायचे याची पद्धती समजावून घेण्यात येणार आहे ज्यामुळे भविष्यात भारतातील कोणत्या वनस्पती दुर्मिळ किंवा अति दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहे याची माहिती मिळण्यास मदत होईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ. एम. बी. वाघमारे यांनी केले तर कार्यशाळेचे उद्दिष्ट व पाहुण्यांची ओळख कार्यशाळेचे समन्वयक डॉ. व्ही. बी. शिंपले यांनी करून दिली. सदर कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठातील जेष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. एस. आर. यादव, डॉ. एन. व्ही. पवार उपस्थित होते. डॉ. एस. ए. देशमुख यांनी आभार मानले.