सर्किट बेंचसंबंधी लवकरच नोटिफिकेशन, आयटीपार्कच्या जागेचा निर्णय पंधरा दिवसात-अमल महाडिक
schedule22 Jul 25 person by visibility 119 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापूरात हायकोर्टाचे सर्किट बेंच होण्यासाठी लवकरच नोटीफिकेशन निघेल. तसेच आयटी पार्कसाठी शेंडा पार्कमधील किंवा शिवाजी विद्यापीठ मधील जागेसंदर्भात पंधरा दिवसात निर्णय होईल.’असे आमदार अमल महाडिक यांनी स्पष्ट केले.
बांधकाम विषयक आणि कोल्हापूर शहराचे प्रलंबित प्रश्नासंबंधी चर्चा करण्यासाठी क्रिडाई कोल्हापूरचे पदाधिकारी व सभासद यांच्या समवेत हॉटेल अयोध्या येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आमदार महाडिक यांनी विविध विषयासंबंधी चर्चा केली. मिटींगमध्ये क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के.पी.खोत यांनी ‘कोल्हापूर शहराच्या विकासासाठी शासनाकडून भरीव फंड मिळावेत, कोल्हापूरला सर्वोच्य न्यायालयाचे सर्किट बेंच होणार असून लवकर अध्यादेश निघावा, कोल्हापुरात आयटी पार्कची निर्मिती, कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगर विकास विभागाकडे सहाय्यक संचालकांचे कायम स्वरूपी पद भरण्याबाबत प्रयत्न व्हावेत. त्यामुळे आपल्या सभासदांच्या व सामान्य नागरिकांच्या बांधकाम विषयक फाईली लवकरात लवकर मंजूर होतील. तसेच कोल्हापूर डी. पी. रोड विकसीत होण्याच्या दृष्टीने कायम स्वरूपी सहाय्यक संचालक नियुक्त होणे गरजेचे आहे. असे नमूद केले.
महाडिक म्हणाले, ‘ कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगरविकास विभागाकडे कायम स्वरूपाचे सहाय्यक संचालक पद भरणे, टी.डी.आर.साठी एक वेगळी खिडकी, युएलसी बाबत सखोल अभ्यास करून महानगरपालिकेच्या अधिकारी यांना सांगणे, प्रॉपटी टॅक्स बाबत सविस्तर माहिती द्या, रस्ते व गटर अंदाजपत्रकात 50% रक्कम भरून घेण्याची अट रद्द करण्यात यावी या सर्वच बाबतीत कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक मॅडम यांचे बरोबर मिटींग घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली. कोल्हापूर शहर खड्डे मुक्त करण्याचे येत्या पंधरा दिवसात काम सुरु होईल, ट्रॅफिक समस्या सोडवण्यासाठी ट्रॅफिक अधिकारी याच्याशी चर्चा करून सोडविण्यासाठी एक मिटींग घेऊ, कोल्हापूरामध्ये सरकारी डेंटल हॉस्पिटल, जिल्हाधिकारी कार्यालायासाठी नवीन इमारतीसंबंधी लवकरच बातमी मिळेल, कोल्हापूर कचरा उठाव, हद्दवाढ, क्रिडा संकुल या सर्वच बाबी प्रधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले. सध्याचे सरकार सकारात्मक असून आपण जे जे प्रश्न मांडलेत त्यांचा पाठपुरावा करत असल्याचे आमदार महाडिक यांनी मान्य केले.
क्रिडाई कोल्हापूरचे उपाध्यक्ष चेतन वसा, सचिव गणेश सावंत, क्रिडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष विद्यानंद, बेडेकर, क्रिडाईचे कोल्हापूर चे माजी अध्यक्ष महेश यादव, क्रिडाई कोल्हापूर चे सहसचिव नंदकिशोर पाटील, निखिल शहा, सहखजानिस श्रीराम पाटील, सागर नांलग, संचालक सचिन ओसवाल,प्रदीप भारमल, आदित्य बेडेकर, चेतन चव्हाण, संदीप पोवार, संग्राम दळवी, अमोल देशपांडे, श्रीकांत पाटील, मौत्तीक पाटील, जेष्ठ सभासद श्रीनिवास गायकवाड, कृष्णा पाटील, अभिजीत मगदूम, धोंडीराम रेडेकर, शंकर गावडे, सुजय होसमणी,विवेकानंद पाटील, श्रीधर कुलकर्णी, संदीप मिरजकर,प्रणव श्रीरसागर, प्रतिक होसमणी, मोनिका बकरे उपस्थित होते. सचिव गणेश सावंत यांनी आभार मानले.