मुश्रीफांची ईच्छा चेअरमनपदाच्या राजीनाम्याची ! पदाधिकारी-कार्यकर्ते म्हणतात राजीनामा होऊ देणार नाही !!
schedule23 Jul 25 person by visibility 85 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहे, असे सुतोवाच केले आहे. परंतु; मुश्रीफ यांना केडीसीसी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ देणार नाही, अशी आग्रही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर होते. माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ हे सर्वसामान्य गोरगरिब शेतकऱ्यांचे नेतृत्व आहे. केडीसीसी बँकेच्या कारभाराच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी कल्याणाचा ध्यास सातत्याने घेतला आहे. बँकेच्या माध्यमातून शेतकरी कल्याणाच्या विविध योजना व धोरणे राबवून त्यानी संबंध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थैर्य मिळवून दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर म्हणाले, दहा वर्षाच्या आधी बँकेवर सहा वर्ष प्रशासक होते. अलीकडच्या दहा वर्षात संचालक मंडळाची सत्ता आहे. या कारकिर्दीत मंत्री मुश्रीफ यांनी बँक नावारूपाला आणली आहे. या बैठकीला जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराव साळोखे, महिला जिल्हाध्यक्षा सौ. शितलताई फराकटे, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने- पाटील, बाळासाहेब देशमुख, नितीन दिंडे, हर्षवर्धन चव्हाण, संभाजीराव पवार, विश्वनाथ कुंभार, आप्पासाहेब धनवडे, शिरीष देसाई, विकासराव पाटील, सुनील भिऊंगडे, विनय पाटील, भिकाजी एकल, हर्षवर्धन चव्हाण, संतोष धुमाळ, गणी ताम्हणकर, निहाल कलावंत, युवराज पाटील, दाजी पाटील, अर्जुन चौगुले उपस्थित होते.